आसामात कमळ केरळात डावे

By admin | Published: May 20, 2016 06:58 AM2016-05-20T06:58:27+5:302016-05-20T09:22:03+5:30

पाच राज्यांमध्ये नवा इतिहास लिहिणारा विधानसभा निवडणुकांचा निकाल गुरुवारी घोषित झाला.

Left in Assam Larvaal Keram | आसामात कमळ केरळात डावे

आसामात कमळ केरळात डावे

Next

हरीश गुप्ता,

नवी दिल्ली- पाच राज्यांमध्ये नवा इतिहास लिहिणारा विधानसभा निवडणुकांचा निकाल गुरुवारी घोषित झाला. आसाममध्ये प्रथमच भाजपाचे कमळ फुलले. या पक्षाने भगवा उंचावत काँग्रेसची १५ वर्षांपासूनची सत्ता उलथवली. तामिळनाडूत जयललितांनी निसटती का होईना, लागोपाठ दुसऱ्यांदा सत्ता काबीज केली. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांचा प. बंगालमध्ये डाव्यांशी आघाडी करण्याचा प्रयोग फसला. बंगालमध्ये काँग्रेसशी समझोता करणाऱ्या डाव्या पक्षांनी (एलफडीएफ) ने केरळमध्ये तर काँग्रेसला सत्तेतूनच हटवले आहे.
पुडुच्चेरीमधील मिळवलेली सत्ता हेच काय ते समाधान काँग्रेसला लाभले. आसाममधील विजय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी वैयक्तिक पातळीवर किती मोठा होता हे त्यांच्या टिष्ट्वटमधून दिसून आले. देशभरातील जनता भाजपावर विश्वास दाखवत आहे. सर्वांगीण आणि सर्वसमावेशक विकासावर जनतेने दाखविलेला हा विश्वास असल्याचे पक्षाला वाटते, असे ते निकाल जाहीर होत असताना प्रतिक्रिया देताना म्हणाले.
>मोदींच्या कामगिरीला पावती
देशाने काँग्रेसमुक्त भारताच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकले आहे. मोदी सरकारच्या दोन वर्षांच्या कामगिरीला व ध्येयधोरणांना जनतेने जोरदार समर्थन दिल्याचे यातून दिसून येते.
- अमित शहा, भाजपाध्यक्ष
>जनतेचा निर्णय स्वीकारतो
काँग्रेस लोकांचा विश्वास प्राप्त करेपर्यंत कठोर मेहनत करेल. आम्ही जनतेचा हा निर्णय नम्रपणे स्वीकारतो. निवडणुकीत विजयी पक्षांना शुभेच्छा देतो.
- राहुल गांधी, उपाध्यक्ष, काँग्रेस
>भ्रष्ट सरकारला धोबीपछाड
केरळातील विजय एलडीएफसाठी मोठा आहे. जनतेने भ्रष्ट सरकारला धोबीपछाड दिला आहे. केरळच्या मुख्यमंत्र्यांसंदर्भात शुक्रवारी बैठक घेतली जाणार आहे.
- प्रकाश करात, माकपा नेते
>ममतांचा विजय ऐतिहासिक...
ममतांच्या तृणमूलने २०११मध्ये २९४पैकी १८४ जागा जिंकल्या होत्या. या वेळी या पक्षाने दुहेरी द्विशतकच पार केले. गेल्या वेळी तृणमूलशी युती करणाऱ्या काँग्रेसने प. बंगालमध्ये ४२ जागा जिंकल्या होत्या. या वेळी तृणमूलने स्वबळावर मिळविलेले यश ऐतिहासिक ठरते.
भाजपाने आसाममध्ये केलेली निवडणूकपूर्व आघाडी कामी आल्याचे पाहता पुढील वर्षी
उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, मणिपूर व गोवा या राज्यांमध्ये तशाच प्रकारची रणनीती अवलंबली जाऊ शकते.
राहुल गांधी यांचा आसाम आणि प. बंगालमधील प्रयोग पुरता फसल्यामुळे काँग्रेसला अधिक आत्मचिंतनाची गरज भासेल.
>तामिळनाडूत भोपळाच, तरीही जयललितांची साथ!
तामिळनाडूत भाजपाला या वेळीही खाते उघडता आले नाही, मात्र या पक्षाने केरळमध्ये प्रथमच पाय रोवले. प. बंगालमध्ये संख्याबळ वाढविले. जयललितांच्या विजयामुळे भाजपाला संसदेत अण्णाद्रमुकची साथ लाभेल.
प. बंगालचा विकास डोळ्यांसमोर ठेवत ममता बॅनर्जीही या पक्षाला मदतीचा हात देऊ शकतात. जयललितांनी गेल्या वेळी २३४पैकी १५० जागा जिंकल्या होत्या. त्या तुलनेत त्यांचे संख्याबळ घटले आहे.

 

Web Title: Left in Assam Larvaal Keram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.