केरळमध्ये येणार डाव्या आघाडीचे सरकार, काँग्रेसचा पराभव
By admin | Published: May 19, 2016 08:55 AM2016-05-19T08:55:19+5:302016-05-19T14:16:24+5:30
केरळ विधानसभा निवडणूकीचा निकाल स्पष्ट झाला असून, इथे डाव्या आघाडीच्या नेतृत्वाखाली एलडीएफचे सरकार येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
तिरुअनंतपूरम, दि. १९ - केरळ विधानसभा निवडणूकीचा निकाल स्पष्ट झाला असून, इथे डाव्या आघाडीच्या नेतृत्वाखाली एलडीएफचे सरकार येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. काँग्रेसच्या नेतृत्वाखाली यूडीएफ आघाडीला मतदारांनी नाकारले आहे. १४० सदस्यांच्या केरळ विधानसभेत एलडीएफ ९० जागांवर आघाडीवर आहे. यूडीएफ ४७ जागांवर आघाडीवर आहे.
Spoke to V S Achuthanandan ji & wished him on his victory & his Party’s impressive performance in the elections.
— Narendra Modi (@narendramodi) May 19, 2016
गेल्या काहीवर्षांपासून केरळमध्ये जोरदार प्रयत्न करणा-या भाजपला अखेर विजयाचा सूर गवसला आहे. नेमॉम विधानसभा मतदारसंघातून भाजप उमेदवार विजयी झाला आहे. प्रारंभी भाजपला दहा जागांवर आघाडी मिळाली होती. पण नंतर ही आघाडी फार काळ टिकली नाही. केरळमध्ये भाजपचा चंचू प्रवेश झाला आहे. केरळमधले मतदार एलडीएफ आणि यूडीएफ आघाडीला दरपाचवर्षांनी आलटून-पालटून संधी देत असतात तीच परंपरा यावेळी कायम राहिली आहे. पी.विजयन एलडीएफचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असू शकतात. मुख्यमंत्रीपदाचे दुसरे दावेदार व्ही.एस.अच्युतानंदन मलामपूझा येथून २७ हजार मतांनी विजय मिळवला.
केरळमध्ये विधानसभेच्या १४० जागा असून, सध्या केरळमध्ये काँग्रेसप्रणीत यूडीएफची सत्ता आहे. ओमेन चंडी केरळचे मुख्यमंत्री आहेत. विधासभेतील सध्याच्या संख्याबळानुसार यूडीएफचे ७३ आमदार आहेत तर, सीपीआय, सीपीएमच्या एलडीएफचे ६७ आमदार आहेत. केरळमध्ये यावेळी ७७.३५ टक्के मतदान झाले आहे. केरळमध्ये भाजपने चांगलाचा जोर लावला होता. इथे भाजप सत्तेच्या शर्यतीत नाही. मात्र या निवडणुकीव्दारे पक्षविस्तार हे भाजपचे लक्ष्य होते.
२०१४ लोकसभा निवडणुकीच्यावेळी काँग्रेसप्रणीत यूडीएफला इथून १२ तर, एलडीएफचा आठ जागा मिळाल्या होत्या. केरळमध्ये दर पाचवर्षांनी यूडीएफ आणि एलडीएफ असा सत्ताबदल होत राहीला आहे. केरळमध्ये एलडीएफची सत्ता येईल असा बुहतांश एक्झिट पोलचा अंदाज खरा ठरताना दिसत आहे.