भारतातून निघाले, पाकमध्ये उतरले; एकाच दिवसात तीन विमान अपघात थाेडक्यात टळले
By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2022 05:42 AM2022-07-06T05:42:49+5:302022-07-06T05:43:24+5:30
यापूर्वीच्या पाच घटनांसह मंगळवारच्या घटनांची डीजीसीए चौकशी करत आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
नवी दिल्ली/मुंबई : मंगळवारचा दिवस विमान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी मोठा भीतिदायक आणि त्रास देणारा ठरला. एकाच दिवशी तीन विमानांमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने तीनही विमानांचे तत्काळ वेगवेगळ्या ठिकाणी लॅण्डिंग करण्यात आले.
घटना पहिली : स्पाईसजेट्चे बोइंग ७३७ मॅक्स हे विमान दिल्लीहून दुबईला जात असताना अचानक विमानाच्या डाव्या इंधन टाकीतून इंधन गळती झाल्याच्या भीतीने कराची विमानतळावर इमर्जन्सी लॅण्डिंग dsले. या विमानात १०० प्रवासी होते.
दुसरी घटना : कांडला (गुजरात) येथून मुंबईला येत असलेल्या विमानाची विंडशिल्ड फुटली. तेव्हा विमान २३ हजार फूट उंचीवर होते. यामुळे या विमानासाठी मुंबई येथील विमानतळावर तातडीच्या लॅण्डिंगची व्यवस्था करण्यात आली.
तिसरी घटना : गो एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे त्याचे पाटण्यात लॅण्डिंग करण्यात आले नाही. विमान परत दिल्लीत नेऊन लॅण्डिंग करण्यात आले.
चौकशी होणार
यापूर्वीच्या पाच घटनांसह मंगळवारच्या घटनांची डीजीसीए चौकशी करत आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.