एक हजार मुलांना सुखरूप सोडले घरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2018 12:38 AM2018-03-03T00:38:13+5:302018-03-03T00:38:13+5:30
मुंबईतील एक हजार हरवलेल्या मुलांना त्यांच्या कुटुंबीयांना सोपविणाºया आरपीएफच्या महिला उप निरीक्षक रेखा मिश्रा यांना केंद्रीय महिला व बालविकास मंत्रालयाने पुरस्काराने सन्मानित करण्याचा निर्णय घेतला आहे.
संतोष ठाकूर
नवी दिल्ली : मुंबईतील एक हजार हरवलेल्या मुलांना त्यांच्या कुटुंबीयांना सोपविणाºया आरपीएफच्या महिला उप निरीक्षक रेखा मिश्रा यांना केंद्रीय महिला व बालविकास मंत्रालयाने पुरस्काराने सन्मानित करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय महिला व बालविकास मंत्री मेनका गांधी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, या महिला उप निरीक्षकांमुळे एक हजार घरांना त्यांची हरवलेली मुले मिळाले आहेत. आम्हाला अशी आशा आहे की, रेखा मिश्रा यांची प्रेरणा घेऊन अन्य रेल्वे स्टेशनांवरही आरपीएफ आणि अन्य स्थानिक पोलीस याच प्रकारचे कार्य करतील. आम्ही लवकरच रेखा यांचा यथोचित सन्मानित करणार आहोत. त्यासाठी रेल्वेलाही सूचना दिली आहे.
आरपीएफ महासंचालकांच्या कार्यालयाच्या माहितीनुसार, रेखा शर्मा मूळच्या उत्तरप्रदेशातील अलाहाबादच्या आहेत. त्या २०११ च्या बॅचच्या आरपीएफ उप निरीक्षक आहेत. प्रशिक्षणानंतर त्या २०१४ पासून नियमित सेवेत आहेत. डिसेंबर २०१४ मध्ये त्यांची नियुक्ती मुंबईत झाली. एक वर्ष त्या महिला सुरक्षा दलात होत्या. त्यानंतर २०१६ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर त्यांना नियुक्त करण्यात आले. या ठिकाणी सेवा बजावत असताना त्यांनी आतायर्पंत ९५३ हरवलेल्या मुलांना त्यांच्या कुटुंबीयांपर्यंत सुखरुप पोहचविले आहे. आरपीएफचे महासंचालक अशा कर्मचाºयांना प्रोत्साहन देतात.
>रेखा शर्मा यांचा आनंद द्विगुणित
रेल्वे बोर्ड आरपीएफ कार्यालयाने सांगितले की, रेखा शर्मा यांच्यासाठी हा पुरस्कार आनंद द्विगुणित करणारा ठरणार आहे; कारण या मार्चमध्ये त्यांचा साखरपुडाही आहे. याबाबत रेखा शर्मा यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला मात्र, नियमांचा हवाला देत त्यांनी याबाबत भाष्य करण्यास नकार दिला.