मिस्त्रींना ‘टाटा’ची कायदेशीर नोटीस
By admin | Published: December 28, 2016 01:55 AM2016-12-28T01:55:04+5:302016-12-28T01:55:04+5:30
टाटा सन्सने आपले पदच्युत चेअरमन सायरस मिस्त्री यांना कायदेशीर नोटीस बजावली आहे. संचालक मंडळाच्या बैठकांचे इतिवृत्त, वित्तीय माहिती आणि आकडेवारी सार्वजनिक
नवी दिल्ली : टाटा सन्सने आपले पदच्युत चेअरमन सायरस मिस्त्री यांना कायदेशीर नोटीस बजावली आहे. संचालक मंडळाच्या बैठकांचे इतिवृत्त, वित्तीय माहिती आणि आकडेवारी सार्वजनिक करून गोपनीयतेचा भंग केल्याचा आरोप मिस्त्री यांच्यावर ठेवला आहे.
टाटा सन्सची कायदा सल्लागार कंपनी शारदुल अमरचंद मंगलदासने मिस्त्री यांना नोटीस बजावली आहे. नोटिसीत म्हटले आहे की, मिस्त्री यांच्या पारिवारिक कंपन्यांनी कंपनी विधी न्यायाधीकरणासमोर दाखल केलेल्या याचिकांसोबत जाणीवपूर्वक गोपनीय दस्तावेज जोडले आहे. त्यात टाटा सन्ससह समूहाच्या अन्य कंपन्या आणि उद्यमांची व्यावसायिक धोरणे, वित्तीय माहिती व अन्य स्वरूपाच्या माहितीचा समावेश आहे. मिस्त्री यांना टाटा सन्सचे संचालक या नात्याने ही गोपनीय आणि संवेदनक्षम माहिती मिळाली होती. ही माहिती सार्वजनिक करण्यात आली आहे. हा टाटा सन्सप्रति विश्वासघात आहे. तसेच टाटा समूहाच्या आचार संहितेचा भंग आहे, असे नोटिसीत म्हटले आहे.
या पुढे अशा प्रकारे गोपनीय माहिती उघड करू नका, असा इशारा मिस्त्री यांना देण्यात आला आहे.