विधानसभा निवडणूक: ११पर्यंत प.बंगालमध्ये ३१% मतदान

By admin | Published: April 4, 2016 07:40 AM2016-04-04T07:40:47+5:302016-04-04T12:14:05+5:30

पश्चिम बंगाल आणि आसाममधील विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली असून सकाळी ११पर्यंत पश्चिम बंगालमध्ये ३१ टक्के मतदान झाले

Legislative Assembly Elections: up to 11% in West Bengal | विधानसभा निवडणूक: ११पर्यंत प.बंगालमध्ये ३१% मतदान

विधानसभा निवडणूक: ११पर्यंत प.बंगालमध्ये ३१% मतदान

Next
ऑनलाइन लोकमत - 
गुवाहाटी/ कोलकाता, दि. ४ -   पश्चिम बंगाल आणि आसाममधील विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली असून  सकाळी ११पर्यंत पश्चिम बंगालमध्ये ३१ टक्के तर आसाममध्ये  १९ टक्के मतदान झाले. 
सोमवारी सकाळी ७ वाजल्यापासून मतदानास सुरुवात झाली असून चोख पोलीस बंदोबस्तात मतदान प्रक्रिया पार पडत आहे. 
पहिल्या टप्प्यात पश्चिम बंगालमधील १८, तर आसाममधील ६५ मतदारसंघांमध्ये निवडणूक होत आहे. पश्चिम बंगालमध्ये सहा टप्प्यांत मतदान होत असले तरी ११ एप्रिल रोजीही पहिल्या टप्प्यातील काही मतदारसंघ समाविष्ट केले जाणार असल्यामुळे मतदानाच्या ७ तारखा राहतील. आसाममध्ये मतदान दोन टप्प्यांत होत आहे. तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांना काँग्रेस-डाव्या आघाडीच्या तगड्या आव्हानांचा मुकाबला करावा लागत असताना आसाममध्ये काँग्रेसच्या तरुण गोगाई यांना सत्ता कायम राखणे कसोटीचे ठरणार आहे.
 

Web Title: Legislative Assembly Elections: up to 11% in West Bengal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.