लेहचा पारा उणे १३.८ अंशांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2017 02:38 AM2017-12-31T02:38:18+5:302017-12-31T02:38:43+5:30
लडाख विभागातील लेह हे शहर जम्मू-काश्मिरातील सर्वाधिक थंड ठिकाण ठरले आहे. येथील रात्रीचा पारा काल उणे १३.८ डिग्री सेल्सिअसवर घसरला. ही जम्मू-काश्मिरातील यंदाची सर्वाधिक थंड रात्र ठरली आहे.
श्रीनगर : लडाख विभागातील लेह हे शहर जम्मू-काश्मिरातील सर्वाधिक थंड ठिकाण ठरले आहे. येथील रात्रीचा पारा काल उणे १३.८ डिग्री सेल्सिअसवर घसरला. ही जम्मू-काश्मिरातील यंदाची सर्वाधिक थंड रात्र ठरली आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, काश्मीर खोरे आणि लडाख विभागातील अनेक ठिकाणी पारा गोठणबिंदूच्या खाली घसरला आहे. फ्रंटिअर लडाख विभागातील लेह शहरात आदल्या रात्री तापमान उणे ११.४ डिग्री होते. ते आणखी घसरून उणे १३.८ डिग्री झाले आहे.
शेजारील कारगिल येथील किमान तापमान आणखी २ डिग्रींनी उतरून उणे ११.२ डिग्री सेल्सिअस झाले. श्रीनगर शहरात उणे ३.५ डिग्री तापमानाची नोंद झाली. आदल्या रात्रीच्या तुलनेत ते २.८ डिग्रींनी थंड ठरले.
दक्षिण काश्मिरातील काझिगुंड येथील तापमान २.४ डिग्रींनी उतरून उणे ३.0 डिग्री झाले. कोकेरनाग येथील तापमान उणे 0.४ डिग्रीपर्यंत उतरले. कुपवाडातील तापमान उणे ३.५ डिग्रीवरून ४.१ डिग्रीवर घसरले आहे.
उत्तर काश्मिरातील प्रसिद्ध स्की रिसॉर्ट गुलमर्ग येथील तापमान ६.६ डिग्रीवर घसरले आहे. आदल्या रात्री ते ५.४ डिग्री होते. (वृत्तसंस्था)