विदेशी पर्यटकांसाठी आता लेहचे निसर्गसौंदर्य झाले खुुले

By admin | Published: October 6, 2016 05:41 AM2016-10-06T05:41:26+5:302016-10-06T05:41:26+5:30

विदेशी पर्यटकांना लडाखच्या लेह जिल्ह्यात प्रतिबंधित क्षेत्रात प्रवास करण्याची परवानगी देण्यासाठी जम्मू काश्मीर सरकारने संरक्षित क्षेत्र परमिटमध्ये (पीएपी) अटी शिथिल केल्या

Leh's natural beauty is now open to foreign tourists | विदेशी पर्यटकांसाठी आता लेहचे निसर्गसौंदर्य झाले खुुले

विदेशी पर्यटकांसाठी आता लेहचे निसर्गसौंदर्य झाले खुुले

Next


श्रीनगर : विदेशी पर्यटकांना लडाखच्या लेह जिल्ह्यात प्रतिबंधित क्षेत्रात प्रवास करण्याची परवानगी देण्यासाठी जम्मू काश्मीर सरकारने संरक्षित क्षेत्र परमिटमध्ये (पीएपी) अटी शिथिल केल्या आहेत. सरकारच्या या निर्णयाने या भागात पर्यटकांची संख्या वाढण्यास आणि स्थानिक अर्थव्यवस्थेचा विकास होण्यास मदत होणार आहे.
या निर्णयामुळे आता विदेशी पर्यटकांना लेहमध्ये यारमा गोम्पा, यारबा गोनबो मठ, फुकपोचे, हरगम, तक्ष, ससोमा, चगलुंग, कोबेट, अरानु, खेमी आणि वारशी यासारख्या भागात पर्यटन करता येणार आहे. एका प्रवक्त्याने सांगितले की, लेह भागात प्रतिबंधित क्षेत्रात प्रवास करण्यासाठी अटी शिथिल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
याबाबत २७ सप्टेबर रोजी एक अधिसूचना जारी करण्यात आली आहे. स्थानिक पर्यटकांसाठी हे क्षेत्र २०१५ मध्ये खुले करण्यात आले होते. या भागांत राहणाऱ्या नागरिकांच्या उपजीविकेच्या साधनात सकारात्मक प्रभाव पाडण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता. दहा हजार फुट
उंचीवरील हा भाग आपल्या असामान्य सौंदर्य, बौद्धमठासाठी आणि
पश्मीना शेळ्यापालनासाठी ओळखला जातो. (वृत्तसंस्था)

काश्मिरातील जनजीवन विस्कळीतच, पण...
श्रीनगर : काश्मीरातील काश्मीरातील हिंसाचाराच्या पार्श्वभूूमीवर येथे ८८ व्या दिवशीही जनजीवन पूर्वपदावर येउ शकलेले नाही. पण, तीन महिन्यानंतर नागरिक दररोजच्या कामकाजासाठी पुन्हा बाहेर पडण्याच्या तयारीत आहेत. अधिकाऱ्यांनी सांगितले की, विक्रेत्यांनी फळ, भाजी, ज्यूस, चहा विक्रीसाठी आपले स्टॉल टीआरसी चौकात सुरु केले आहेत. दिवसभर आपला हा छोटा व्यवसाय सुरु ठेवला. लाल चौकासह शहराच्या अनेक भागात बसची वाहतूक सुरु झाली. तर खासगी वाहतूकही काही प्रमाणात सुरु झाली.

Web Title: Leh's natural beauty is now open to foreign tourists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.