पंधरा दिवसांत शेतकऱ्यांना कर्जमाफी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2018 04:48 AM2018-05-31T04:48:43+5:302018-05-31T04:48:43+5:30

पंधरा दिवसांत शेतक-यांना कर्जमाफी करण्यासंदर्भात केलेला वायदा पूर्ण करण्यास मी बांधील असून, या आश्वासनापासून माघार घेणार नाही

Lending to farmers in fifteen days | पंधरा दिवसांत शेतकऱ्यांना कर्जमाफी

पंधरा दिवसांत शेतकऱ्यांना कर्जमाफी

Next

बंगळुरू : पंधरा दिवसांत शेतक-यांना कर्जमाफी करण्यासंदर्भात केलेला वायदा पूर्ण करण्यास मी बांधील असून, या आश्वासनापासून माघार घेणार नाही, अशी हमी कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी दिली. शेतकºयांना दिलासा देण्यास माझ्या सरकारचे प्राधान्य असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
निवडणुकीपूर्वी शेतकºयांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यास दिरंगाई होत असल्याप्रकरणी कुमारस्वामी यांच्याविरुद्ध भाजप आक्रमक आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी शेतकरी संघटना आणि प्रगत शेतकºयांच्या प्रतिनिधींची भेट घेऊन शेतकºयांना भेडसावणाºया समस्यांवर चर्चा केली. कर्जमाफीबाबत पंधरा दिवसांत निर्णय होईल. कितीही अडचणी येवोत, पंधरा दिवसांत कर्जमाफीच्या निर्णयाची पूर्णत: अंमलबजावणी केली जाईल. आर्थिक शिस्त राखण्यास आमचे सरकार बांधील आहे, तसेच शेतकºयांना वाचविण्याची आमची बांधिलकी आहे, असे कुमारस्वामी यांनी तीन तासांच्या या चर्चेनंतर स्पष्ट केले. उपमुख्यमंत्री जी. परमेश्वर या मुद्यावर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याशी चर्चा करतील, असेही मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी यावेळी सांगितले.

या बैठकीला उपमुख्यमंत्री परमेश्वर, विधानसभेतील विरोधी पक्षाचे उपनेते गोविंद कारजोला (भाजप) आणि राज्य सरकारचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. कर्जाच्या रकमेची आकडेमोड केली जात आहे. हजारो कोटींचे कर्ज असले तरी तुम्हाला या आर्थिक संकटातून वाचविण्याची आमच्या सरकारची जबाबदारी आहे. दोन-तीन दिवसांत राष्टÑीयीकृत बँकेच्या प्रतिनिधींची बैठक बोलावून शेतकºयांना दिलेल्या कर्जाबाबत त्यांच्याकडून माहितीही घेऊ, असेही कुमारस्वामी यांंनी या बैठकीत सांगितले.

Web Title: Lending to farmers in fifteen days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.