यंदा देशात सरासरीपेक्षा कमीच पाऊस: महाराष्ट्रात सामान्य, तर गुजरात, राजस्थानात दुष्काळाची भीती
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2021 07:26 AM2021-08-24T07:26:05+5:302021-08-24T07:26:54+5:30
स्कायमेटचा अंदाज: हिंद महासागरातील इंडियन निनोच्या नकारात्मक स्थितीमुळे (आयओडी) पावसाचे प्रमाण कमी झाले असावे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : यंदा जून ते सप्टेंबर या चार महिन्यांत सामान्य पातळीपेक्षा कमी पाऊस होण्याची ६० टक्के शक्यता आहे, असे भाकीत स्कायमेटने वर्तविले आहे. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश येथे पुरेशा प्रमाणात पाऊस पडत आहे. त्यामुळे या राज्यांच्या कृषी उत्पादनावर फारसा परिणाम होण्याची शक्यता नाही. गुजरात, राजस्थानच्या पश्चिम भागात दुष्काळ पडण्याची भीती स्कायमेटने वर्तविली आहे.
या चार महिन्यांत दीर्घ कालावधीचे सरासरी पर्जन्यमान ९३ टक्के राहील. यंदा जूनमध्ये सामान्य पातळीपेक्षा अधिक पाऊस पडला. जुलैच्या प्रारंभी पाऊसमान जरा कमी झाले होते. ११ जुलैपर्यंत फार पाऊस पडला नाही. दीर्घ कालावधीच्या सरासरी पर्जन्यमानाच्या तुलनेत जून व जुलैमध्ये ११० टक्के व ९३ टक्के पाऊस झाल्याचे स्कायमेटने म्हटले.
ऑगस्टच्या पहिल्या पंधरवड्यातही कमी पाऊस झाला आहे. त्या स्थितीत अद्याप सुधारणा झालेली नाही. गुजरात, राजस्थान, ओडिशा, केरळ, ईशान्य भारतात त्यामुळे कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
सप्टेंबरमध्येही चित्र वेगळे नसण्याची शक्यता
nऑगस्टमध्ये दीर्घ कालावधीचे सरासरी पर्जन्यमान २५८.२ मिमी गृहीत धरण्यात आले आहे. त्यापेक्षा कमी पाऊस होण्याची ८० टक्के शक्यता आहे. तर सामान्य पातळीपेक्षा कमी पाऊस होण्याची २० टक्के शक्यता आहे.
nसप्टेंबरमध्ये दीर्घ कालावधीचे सरासरी पर्जन्यमान १७०.२ मिमी गृहीत धरले असून या महिन्यात सामान्य पातळीचा पाऊस होण्याची शक्यता ६० टक्के, सामान्य पातळीपेक्षा अधिक व सामान्य पातळीपेक्षा कमी पाऊस होण्याची शक्यता प्रत्येकी २० टक्के आहे, असे स्कायमेटने म्हटले आहे.
ग्रीनलँडवर प्रथमच मुसळधार पाऊस
ग्रीनलँडच्या इतिहासात प्रथमच त्याच्या सर्वोच्च बर्फाळ शिखरावर मुसळधार पाऊस पडला. त्यामुळे वैज्ञानिकांना वाटणारी काळजी वाढली आहे. या पावसाचे पाणी सात कोटी टन पडले.
निनोची नकारात्मक स्थिती