तेलंगणाच्या शाळेत नरसिंहरावांवर धडा
By admin | Published: June 29, 2015 12:13 AM2015-06-29T00:13:09+5:302015-06-29T11:59:51+5:30
माजी पंतप्रधान पी.व्ही. नरसिंहराव यांच्या जीवनावरील इतिहास तेलंगणाच्या शाळेमधून शिकविण्याचा निर्णय तेलंगणा सरकारने घेतला असल्याची माहिती खासदार बी. विनोदकुमार यांनी दिली.
Next
करीमनगर : माजी पंतप्रधान पी.व्ही. नरसिंहराव यांच्या जीवनावरील इतिहास तेलंगणाच्या शाळेमधून शिकविण्याचा निर्णय तेलंगणा सरकारने घेतला असल्याची माहिती खासदार बी. विनोदकुमार यांनी दिली.
नरसिंहराव यांच्या ९४ व्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर तेलंगणातील शाळेच्या अभ्यासक्रमात त्यांच्या जीवनावरील इतिहास समाविष्ट केला जाईल. नरसिंहराव यांनी आणलेल्या आर्थिक सुधारणांमुळेच देश विकसित झाला. यापूर्वीच्या संपुआ सरकारने या नेत्याच्या कर्तृत्वाकडे दुर्लक्ष केले होते, असे ते म्हणाले. राव यांचा जन्म २८जून १९२१ रोजी तेलंगणाच्या करीमनगर येथे झाला होता.