कोरोनाबाधितांचा आकडा वाढला तरी चालेल, पण...; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मुख्यमंत्र्यांना आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2021 08:35 PM2021-04-08T20:35:59+5:302021-04-08T20:36:20+5:30
PM Narendra Modi holds meeting with Chief Ministers on the current COVID19 situation: कोरोनाचे रुग्ण वाढल्याने एकीकडे राजकारण रंगलेले असताना मोदींनी मुख्यमंत्र्यांना हे आदेश दिले आहेत.
देशात कोरोनारुग्णांची संख्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर वाढू लागली आहे. अनेक ठिकाणी कोरोना रुग्णांची संख्या लपविण्यासाठी चाचण्यांचे प्रमाण कमी करण्यात येत असल्याचे आरोप होत आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्व मुख्यमंत्र्य़ांसोबतच्या ऑनलाईन बैठकीत कोरोना रुग्णांची संख्या वाढली तरी चालेल, परंतू कोरोना चाचणीची संख्या वाढविण्याचे आदेश दिले आहेत. (I appeal to you all to stress on COVID19 testing. Our target is to do 70% RT-PCR tests. Let the number of positive cases come high, but do maximum testing. : PM Modi during meeting with CMs)
कोरोनाचे रुग्ण वाढल्याने एकीकडे राजकारण रंगलेले असताना मोदींनी मुख्यमंत्र्यांना हे आदेश दिले आहेत. सर्व राज्यांनी कोरोना टेस्टिंगची व्याप्ती वाढवावी. 70 टक्के RT-PCR टेस्ट झाल्या पाहिजेत. देशातील, राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा वाढला तरी चालेल, परंतू चाचण्या वाढवायला हव्यात. योग्य पद्धतीने स्वॅब घेणे खूप गरजेचे आहे, तसेच त्याची चाचणी होणेदेखील खूप महत्वाचे आहे, असे मोदी म्हणाले.
We must concentrate on micro-containment zones. In places where night curfew has been imposed, I would urge to use the word 'Corona Curfew', to continue alertness about coronavirus. It will be better to start curfew timing from 9pm or 10pm till 5am or 6am: PM Modi pic.twitter.com/BXZukPcPuC
— ANI (@ANI) April 8, 2021
कोरोनाचा विळखा कमी करण्यासाठी आणि कोरोनावर मात करण्यासाठी रुग्णांचा शोध आणि त्यांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेणे गरजेचे आहे. युद्धपातळीवर हे काम करण्याची गरज आहे. आपल्याला आता पुरेसा अनुभव आलेला आहे. तसेच सोबत अन्य स्त्रोतांसह लसही आहे, असे मोदी यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले.
Corona Vaccine Shortage: महाराष्ट्राने 5 लाख डोस वाया घालवले, असे कसे चालेल? प्रकाश जावडेकरांचा गंभीर आरोप
आपल्याला कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसोबत दोन हात करायचे आहेत. महाराष्ट्र, गुजरात, छत्तीसगड, पंजाबमध्ये कोरोनाच्या लाटेने पहिली उसळी पार केली आहे. हे एक मोठे संकट आहे. काही राज्यांत प्रशासनाने हे हलक्यात घेतले आहे. लोकांनी सजग रहायला हवे, असे मोदी म्हणाले. (PM Narendra Modi holds meeting with Chief Ministers on the current COVID19 situation)
CoronaVirus: रेमडेसीवीरचे उत्पादन दुप्पट करा; राजेश टोपेंची ७ कंपन्यांसोबत बैठक