भारताचा चुकीचा नकाशा दाखवल्याबद्दल गुगलवर बहिष्कार टाका - भाजपा खासदार

By admin | Published: December 18, 2015 06:50 PM2015-12-18T18:50:20+5:302015-12-18T20:58:29+5:30

भारताचा चुकीचा नकाशा दाखवल्याबद्दल गुगलवर बहिष्कार टाका अशी मागणी भाजपा खासदार तरूण विजय यांनी केली.

Let's boycott Google for showing a wrong map of India - BJP MP | भारताचा चुकीचा नकाशा दाखवल्याबद्दल गुगलवर बहिष्कार टाका - भाजपा खासदार

भारताचा चुकीचा नकाशा दाखवल्याबद्दल गुगलवर बहिष्कार टाका - भाजपा खासदार

Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १८ - इंटरनेटवर भारताचा चुकीचा नकाशा दाखवण्यात येत असल्याबद्दल नाराजी दर्शवत 'देशाचा असा चुकीचा नकाशा दाखवणा-या गुगलवर बहिष्कार टाका' अशी मागणी भाजपा खासदार तरूण विजय यांनी राज्यसभेत शुक्रवारी केली. मायक्रोसॉफ्ट, गुगल व इतर अमेरिकी कंपन्या भारताच्या नकाशात फेरफार चुकीचा नकाशा पसरवत असून जोपर्यंत ही चूक सुधारली जात नाही तोपर्यंत त्यांच्यावर बहिष्कार टाकण्यात यावा असे विजय यांनी म्हटले.
तरूण विजय यांनी शून्य प्रहरादरम्यान हा मुद्दा उपस्थित केला. मायक्रोसॉफ्ट तसेच गुगलच्या वेबसाइटवर नकाशातील चुका दाखवताना त्या नकाशात संपूर्ण काश्मीर पाकिस्तानमध्ये तर अक्साई चीन हा भारताचा भूभाग चीनमध्ये दाखवण्यात आल्याचे विजय यांनी नमूद केले. यावर तत्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणीही त्यांनी केली. 
इंटरनेटवर जे चुकीचे नकाश पसरविण्यात आले आहेत, त्यामुळे भारतीयांच्या भावना दुखावल्या जातात. याबाबत सरकारने मौन का बाळगले? या मुद्यावर सरकारने निषेध का नोंदवला नाही? असा सवाल तरूण विजय यांनी विचारला. जोपर्यंत या चुका सुधारण्यात येत नाही तोपर्यंत या कंपन्यांवर बहिष्कार टाकावा व त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी तरूण विजय यांनी केली. 
भारताचा नकाशा वारंवार चुकीचा दाखवल्याबद्दल एप्रिल महिन्यात अल जझिरा या आंतरराष्ट्रीय वृत्तवाहिनीचे भारतातील प्रक्षेपण पाच दिवसांसाठी बंदी घालण्यात आली होती. तर भारताच्या आंतरराष्ट्रीय सीमा चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आल्यामुळे गुगल मॅप्सविरोधात गेल्या डिसेंबरमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

Web Title: Let's boycott Google for showing a wrong map of India - BJP MP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.