न्यू इंडिया निर्माण करू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2017 06:23 AM2017-08-15T06:23:17+5:302017-08-15T10:18:56+5:30

स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला देशवासीयांना संबोधित करताना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी न्यू इंडियाचे चित्र देशासमोर उभे केले.

Let's create new India | न्यू इंडिया निर्माण करू

न्यू इंडिया निर्माण करू

नवी दिल्ली : स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला देशवासीयांना संबोधित करताना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी न्यू इंडियाचे चित्र देशासमोर उभे केले. या न्यू इंडियामध्ये सर्वजण सुखी राहावेत. गरिबीला स्थान असता कामा नये. हान्यू इंडिया सर्वांच्या डीएनएमध्ये वसला पाहिजे. तसेच त्यात कोणत्याही प्रकारच्या भेदभावांना स्थान असता कामा नयेत, असे कोविंद म्हणाले. देशाचे १५ वे राष्ट्रपती म्हणून नुकतीच शपथ घेतलेल्या कोविंद यांनी प्रथमच देशवासियांना संबोधित केले. या वेळी स्वातंत्रसैनिकांनी देशासाठी केलेला त्याग, देशाची होत असलेली प्रगती आणि सरकारच्या निर्णयांना जनतेकडून होत असलेले सहकार्य यांचा उल्लेख करतानाच त्यांनी वेगाने आकार घेत असलेल्या न्यू इंडियाचा ठळकपणे उल्लेख केला.

स्वातंत्र्य सैनिकांच्या योगदानालाही त्यांनी उजाळा दिला. महात्मा गांधी, बाबासाहेब आंबेडकर आणि सरदार वल्लभभाई पटेल यांचाही विशेष उल्लेख केला. तसेच राजकीय लक्ष्य प्राप्त करणे हा या व्यक्तींचा उद्देश नव्हता, असे ते म्हणाले. सरकारच्या योजना सर्वांपर्यंत पोहोचाव्यात यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत.

Web Title: Let's create new India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.