सहा महिन्यांत दहशतवाद नष्ट करू

By admin | Published: October 5, 2016 05:45 AM2016-10-05T05:45:13+5:302016-10-05T05:45:13+5:30

पाकव्याप्त काश्मीरमध्ये असलेल्या दहशतवाद्यांच्या तळांची फार मोठी हानी सलग सहा महिने मोहीम राबवून करता येऊ शकेल, असे भारताच्या सशस्त्र दलांनी राजकीय नेतृत्वाला सांगितले आहे.

Let's destroy terrorism in six months | सहा महिन्यांत दहशतवाद नष्ट करू

सहा महिन्यांत दहशतवाद नष्ट करू

Next

नवी दिल्ली : पाकव्याप्त काश्मीरमध्ये असलेल्या दहशतवाद्यांच्या तळांची फार मोठी हानी सलग सहा महिने मोहीम राबवून करता येऊ शकेल, असे भारताच्या सशस्त्र दलांनी राजकीय नेतृत्वाला सांगितले आहे. लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिलेली माहिती अशी की, गेल्या आठवड्यात भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये जाऊन दहशतवाद्यांचे तळ नष्ट केले व ३८ दहशतवाद्यांना ठार मारले. हे असे हल्ले अधूनमधून केले तरी त्यामुळे दहशतवाद्यांच्या क्षमतेचे नुकसान होणार नाही तर त्यासाठी मध्यम मुदतीच्या योजनेची गरज आहे, असे राजकीय नेतृत्वाला सांगितले आहे.

सशस्त्र दलांतील वरिष्ठ व्यूहरचनाकारानेही सरकारने काश्मीरमध्ये सर्जिकल आॅपरेशनचे पडसाद उमटतील म्हणून तयार राहावे, असे सांगितले. रविवारी बारामुल्लातील सीमा सुरक्षा दलाच्या छावणीवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. देशात इतरत्रही असे हल्ले होऊ शकतात. सर्जिकल आॅपरेशनसारख्या हल्ल्यांसाठी दहशतवाद्यांचे तळही लक्ष्य करणे गरजेचे आहे व त्यासाठी निश्चयाने मोहीम राबवावी लागेल, असे हा अधिकारी म्हणाला.

दहशतवाद्यांचे नेटवर्क आता दोन पावले मागे गेले असले तरी खरोखर काही साध्य करायचे असेल तर मध्यम मुदतीची म्हणजे सहा महिन्यांची मोहीम राबवावी लागेल. एखाद्या हल्ल्याने त्यांना रोखता येणार नाही, असे हा अधिकारी म्हणाला. सर्जिकल आॅपरेशनचा सूड घेण्यास पाकमध्ये असलेल्या व दहशतवाद्यांना हाताळणाऱ्यांकडून येत्या आठवड्यांत आणखी जास्त दहशतवादी घुसविण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो, असे भारताच्या जनरल्संना
वाटते. (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: Let's destroy terrorism in six months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.