श्री.चुडामण बोरसे यांच्याकडे द्यावे पोळ्याच्या विशेष पानासाठी आयटेम गोधनाच्या जीवामृताने फुंकले शेतीत प्राण
By admin | Published: September 11, 2015 09:24 PM2015-09-11T21:24:59+5:302015-09-11T21:24:59+5:30
चंद्रकांत जाधव
Next
च द्रकांत जाधवदेशातील शेतीला साडेदहा हजार वर्षांचा इतिहास आहे. शेतीचे अभ्यासक, जुने जाणते व संशोधक यांच्यानुसार पूर्वीची शेती ही स्थलांतरित होती. म्हणजेच एका ठिकाणी दोन ते तीन वर्षे शेती केली जायची. जमिनीची ताकद कमी झाली की नंतर जंगल कापून दुसर्या ठिकाणावर शेती करायला समूहाने लोक जायचे. अजूनही हिमालय आणि साद्रीत अशा पद्धतीची शेती करतात. पूर्वी शेणखताशिवाय शेती कुणी करीत नसते. खंडीभर गायी (२० गायी) पाळण्याचा प्रघातच होता. शेतात शेणखताचा वापर करणारा भगवान श्रीकृष्ण पहिला व्यक्ती होता, असेही तज्ज्ञांच्या भाषणात, लिखाणात येते. गायींच्या माध्यमातून शेती कसण्यासाठी गोर्हे, दूध, गोमुत्र, शेण मिळते. गाय ही शेतकर्याचे श्रद्धास्थान आहे. राज्यात खान्देशात निमाली, मराठवाड्यात लाल कंधारी, विदभार्थ गवळाऊ, पश्चिम महाराष्ट्रात खिल्लार तसेच कांकरेज, गीर आदी जातीच्या गायी आहेत. तर देशात गायींच्या ३६ जाती आहेत. विश्वासराव पाटील, जगन्नाथ धनसिंग पाटील यांच्यासारखे अनेक शेेतकरी विविध जातींच्या गायींचे जतन करीत आहेत. सणासुदीला गायीची आवर्जून दारासमोर पूजा केली जाते, तिला गोडधोड खाऊ घातले जाते. परंतु पुरातन शेती ही आज संयुक्तिक आहे का, हा प्रश्न पडतो. कारण गायींची संख्या झपाट्याने कमी झाली आहे. यामागे शेतमजुरी महागणे, नैसर्गिक आपत्ती, शेतमालाचे कोसळणारे भाव, शेती करण्याबाबतची युवक, महिलांमधील अनास्था अशी अनेक कारणे आहेत. पण आजही पुरातन शेती करण्याचे धाडस काही शेतकरी करतात. काही शेतकरी आवर्जून शेतात दरवर्षी एकरी ३०, ४० ते ५० बैलगाड्या गायींचे शेणखत टाकतात. यात दरवर्षी एकरी १८ बैलगाड्या गायीचे शेणखत म्हणजेच नऊ टन शेणखत टाकले तर पिकांबाबत अपेक्षित स्थिती निर्माण होते, असा अनुभव शेतकरी सांगतात. नैसर्गिक शेतीच्या प्रणेत्यानुसार एकरी नऊ टन शेणखत टाकायचे असले तर प्रत्येक शेेतकर्याकडे १० देशी गायी असायला हव्यात, असा सरळ हिशोब लावता येईल. देशात ४५ कोटी एकर शेती आहे म्हणजेच शेणखत मिळून पिके जोमात यावीत, शेतकर्यांना अपेक्षित यश मिळावे यासाठी ४५० कोटी देशी गायी देशात असणे आवश्यक आहे. परंतु देशात आजघडीला फक्त आठ कोटी देशी व इतर गायी आहेत. अनेक शेेतकरी देशी काय इतर गायींचे शेणखत दरवर्षी घेऊ शकत नाहीत.