मंत्रालयात येऊन आत्महत्या करु का?, 98 वर्षीय सैनिकाचा सरकारला सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2018 04:40 PM2018-03-14T16:40:41+5:302018-03-14T16:42:47+5:30

त्यामुळं त्यांनी मंत्रालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे. 

Let's go to Mantralaya and commit suicide ?, the government's question about the 98-year-old soldier | मंत्रालयात येऊन आत्महत्या करु का?, 98 वर्षीय सैनिकाचा सरकारला सवाल

मंत्रालयात येऊन आत्महत्या करु का?, 98 वर्षीय सैनिकाचा सरकारला सवाल

Next

नवी दिल्ली -  54 वर्षापूर्वी सरकारकडून घेतलेल्या जमिनाचा हिस्सा मिळवण्यासाठी फेऱ्या मारत असलेल्या  98 वर्षीय माजी सैनिकानं मंत्रालयात येऊन आत्महत्या करु का? असा प्रश्न सरकारपुढे उपस्थित केला आहे. सतारा येथे राहणारे 98 वर्षीय चंद्रशेखर जंगम एक माजी भारतीय सैनिक आहेत. 54 वर्षापूर्वी त्यांनी सरकारकडून काही जमीन घेतली होती. त्याचे पैसेही त्यांनी जमा केले होते. पण असून त्यांना ती जमीन मिळाली नाही आमि त्याचा त्यांना मोबदलाही मिळत नाही. त्यासाठी ते सरकारच्या दारात चकरा मारत आहेत. पण सरकारकडून काही उत्तरे मिळत नाही. त्यामुळं त्यांनी मंत्रालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे. 

मिड डेच्या वृत्तानुसार चंद्रशेखर यांनी 1962च्या चीन आणि 1965च्या पाकिस्तान विरोधातील लढाईमध्ये सेवा बजावली होती. 1971मध्ये सुबेदार पदावरुन चंद्रशेखर निवृत्त झाल्यानंतर त्यांनी ही कल्पनाही केली नसेल की ज्या देशासाठी त्यांनी आपले पूर्ण आयुष्यभऱ सेवा दिली तिथे त्यांना चकरा माराव्या लागतात.  वयोमानानुसार चंद्रशेखर यांना त्यांचे शरिर साथ देत नाही.  ते सतत आजारपणामुळे ते रुग्णलयाच्या चकरा मारत असतात.

चंद्रशेखर यांच्या पत्नी चंद्रभागा म्हणाल्या, 1964 मध्ये आम्ही सरकारी योजनेअंतर्गत काही जमीन घेतली होती. 16,880 रुपयामध्ये त्यांनी फ्लॉट विकत घेतला होता. या जागेची खरेदी केलेली प्रतही त्यांच्याकडे आहे. जिल्हाधिकारी कार्यलयात चकरा मारल्यानंतरही जागा आपल्या नावावर होत नाही हे पाहून त्यांनू 1977 मध्ये पैसे माघारी मागितले. पण त्यांना त्यांचे पैसेही माघारी मिळत नाहीत. 40 ते 50 वर्षे होऊनही त्यांना त्यांचा हक्क मिळत नाही त्यामुळं त्यांनी आत्मदहन करण्याचा इशारा सरकारला दिला आहे. 

 

Web Title: Let's go to Mantralaya and commit suicide ?, the government's question about the 98-year-old soldier

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.