नवा भारत घडवण्याचा संकल्प करूया - मोदी
By admin | Published: March 12, 2017 05:03 PM2017-03-12T17:03:10+5:302017-03-12T17:03:10+5:30
उत्तर प्रदेशमध्ये भाजपाला दणदणीत विजय मिळवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज नवा भारत घडत असून, तो
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 12 - उत्तर प्रदेशमध्ये भाजपाला दणदणीत विजय मिळवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज नवा भारत घडत असून, तो विकासाच्या बाजूने आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. जनतेने नवा भारत घडवण्यासाठी संकल्प करावा आणि त्यासाठी नरेंद्र मोदी मोबाइल अॅपवरून त्याबाबत आपली कटिबद्धता व्यक्त करावी, असे आवाहन मोदींनी केले.
आज सकाळी मोदींनी ट्विटरवरून भाजपाला मिळालेल्या मोठ्या विजयानंतर ट्विटरवरून आपले सविस्तर मतप्रदर्शन केले. त्यात ते म्हणाले, एक नवा भारत घडत आहे, ज्याच्या जवळ 125 कोटी भारतीयांची ताकद आणि क्षमता आहे. हा भारत विकासाच्या बाजूने आहे, ते पुढे म्हणतात की 2022 मध्ये जेव्हा आपण स्वातंत्र्याची 75 वर्षे पूर्ण करू तेव्हा आपण असा भारत घडवला पाहिजे, ज्या भारतावर गांधीजी, सरदार पटेल आणि बाबासाहेब आंबेडकरांना गर्व असेल.
भाजपाने उत्तर प्रदेशमध्ये विखुरलेल्या विरोधकांना धोबीपछाड देत शनिवारी अभूतपूर्व विजय मिळविला होता. 403 सदस्यीय राज्य विधानसभेसाठी घेण्यात आलेल्या निवडणुकीत भाजपाने तीन चतुर्थांश म्हणजे तब्बल 325 जागा जिंकून राज्यात एकहाती सत्ता काबीज केली. या निवडणुकीत सपा-काँग्रेस युती आणि बसपाचा दारुण पराभव झाला. युतीला 55 तर बसपाला केवळ 19 जागा जिंकता आल्या.
A new India is emerging, which is being powered by the strength & skills of 125 crore Indians. This India stands for development.
— Narendra Modi (@narendramodi) March 12, 2017
When we mark 75 years of freedom in 2022, we should have made an India that will make Gandhi Ji, Sardar Patel & Dr. Babasaheb Ambedkar proud
— Narendra Modi (@narendramodi) March 12, 2017