केरळच्या मुख्यमंत्र्यांचा शिरच्छेद करणा-याला 1 कोटी देईन - RSS नेता
By admin | Published: March 2, 2017 01:52 PM2017-03-02T13:52:00+5:302017-03-02T13:52:27+5:30
केरळमध्ये गेल्या कित्येक वर्षांपासून डावे पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये संघर्ष सुरु आहे. हा वाद फक्त शाब्दीक लढाईपुरता मर्यादीत नाही.
Next
ऑनलाइन लोकमत
इडुक्की, दि. 2 - केरळमध्ये गेल्या कित्येक वर्षांपासून डावे पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये संघर्ष सुरु आहे. हा वाद फक्त शाब्दीक लढाईपुरता मर्यादीत नाही. या संघर्षातून दोन्ही गटात अनेकदा हिंसाचार झाला असून, काही राजकीय हत्याही झाल्या आहेत. सध्या हा संघर्ष इतका वाढला आहे की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते कुंदन चंद्रावत यांनी जो कोणी केरळचे मुख्यमंत्री मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांचा शिरच्छेद करेल त्याला 1 कोटी रुपयांचे इनाम देण्याची घोषणा केली आहे.
विजयन यांचे मुंडके आणून देणा-याला इनामाची रक्कम देण्यासाठी मी माझे राहते घर सुद्धा विकून टाकेन असे चंद्रावत म्हणाले. कुंदन चंद्रावत उज्जैनचे आरएसएस प्रमुख आहेत. उज्जैन येथील एका जाहीर कार्यक्रमात त्यांनी हे विधान केले. यावेळी खासदार चिंतामणी मालवीय आणि आमदार मोहन यादव उपस्थित होते.
केरळमध्ये अनेक राजकीय हत्या झाल्या आहेत. ज्यामध्ये आरएसएस, भाजप आणि सीपीएम कार्यकर्त्यांना प्राण गमवावे लागले आहेत. मागच्या महिन्यात भाजपा नेते संतोष यांची हत्या झाली. मे 2016 मध्ये विजयन यांनी मुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर संघपरिवाराशी संबंधित नेत्याची झालेली ही आठवी हत्या आहे.