दीक्षितवाडीतील ओपनस्पेस घेणार परत विभागीय आयुक्तांना पत्र : उद्यमी संस्थेने अटी-शर्तीर्ंचे उल्लंघन केल्याचा ठपका
By admin | Published: April 21, 2016 11:33 PM2016-04-21T23:33:26+5:302016-04-21T23:33:26+5:30
जळगाव : दीक्षितवाडीतील ओपनस्पेस कराराने दिलेल्या उद्यमी संस्थेने करारातील अटी-शर्तीर्ंचे उल्लंघन केल्याचा ठपका नगररचना विभागाने ठेवला असून तसे पत्र विभागीय आयुक्तांना पाठवून ही जागा या संस्थेला देण्याबाबतचे आदेश रद्द करण्याची विनंती केली आहे.
Next
ज गाव : दीक्षितवाडीतील ओपनस्पेस कराराने दिलेल्या उद्यमी संस्थेने करारातील अटी-शर्तीर्ंचे उल्लंघन केल्याचा ठपका नगररचना विभागाने ठेवला असून तसे पत्र विभागीय आयुक्तांना पाठवून ही जागा या संस्थेला देण्याबाबतचे आदेश रद्द करण्याची विनंती केली आहे. दीक्षितवाडीतील ओपनस्पेस उद्यमी संस्थेला देण्यात आली होती. विभागीय आयुक्त, नाशिक यांच्या आदेशाने ही जागा कराराने देण्यात आली होती. या करारात काही अटी-शर्तीही टाकण्यात आल्या होत्या. त्यामुळे नगररचना विभागाकडे याबाबत तक्रारी प्राप्त झाल्यावर त्यावर सुनावणी घेऊन नगररचना सहायक संचालकांनी जागा ताब्यात घेण्याबाबतचे सकारण आदेश काढले आहेत. तसेच विभागीय आयुक्त, नाशिक यांच्या आदेशाने ही जागा दिलेली असल्याने त्यांच्या आदेशातील अटी-शर्तीर्ंचे संस्थेने उल्लंघन केल्याचा उहापोह करून १९९६ च्या शासन निर्णयानुसार हा आदेश रद्द करण्याची विनंती विभागीय आयुक्तांना केली आहे.