घेणे २ कोटी वसुली पावणेनऊ कोटीची मुलभूत सोयी सुविधांची रक्कम परत करा : महापौरांचे जिल्हाधिकार्यांना पत्र
By Admin | Published: March 16, 2016 08:34 AM2016-03-16T08:34:23+5:302016-03-16T08:34:23+5:30
जळगाव : मनपातर्फे महाराष्ट्र शिक्षण कर व रोजगार हमी करापोटीची वसूल केलेली रक्कम वेळोवेळी भरणा करण्यात आलेली असल्याने मनपाकडे केवळ २ कोटींची थकबाकी होती. असे असताना मुद्रांक शुल्कापोटीचे १ कोटी ९२ लाखांचे अनुदान जमा केल्याने केवळ १६ लाखांची थकबाकी उरलेली असताना जिल्हा प्रशासनाने मनपाला विकास कामासाठी मिळालेला ८ कोटी ७५ लाखांचा निधी परस्पर जमा तहसीलदारांकडे वर्ग केला आहे. तो निधी मनपाच्या खात्यावर वर्ग करण्याची मागणी महापौर नितीन ला यांनी जिल्हाधिकार्यांकडे पत्राद्वारे केली आहे.
ज गाव : मनपातर्फे महाराष्ट्र शिक्षण कर व रोजगार हमी करापोटीची वसूल केलेली रक्कम वेळोवेळी भरणा करण्यात आलेली असल्याने मनपाकडे केवळ २ कोटींची थकबाकी होती. असे असताना मुद्रांक शुल्कापोटीचे १ कोटी ९२ लाखांचे अनुदान जमा केल्याने केवळ १६ लाखांची थकबाकी उरलेली असताना जिल्हा प्रशासनाने मनपाला विकास कामासाठी मिळालेला ८ कोटी ७५ लाखांचा निधी परस्पर जमा तहसीलदारांकडे वर्ग केला आहे. तो निधी मनपाच्या खात्यावर वर्ग करण्याची मागणी महापौर नितीन ला यांनी जिल्हाधिकार्यांकडे पत्राद्वारे केली आहे. या पत्रात म्हटले आहे की, मनपाकडे महाराष्ट्र शिक्षण कर व रोजगार हमी करापोटी १०कोटी ७० लाख ४१ हजार ११२ रुपयांची थकबाकी मनपाकडे दर्शवित तशी नोटीस तहसीलदारांनी बजावली होती. मात्र मनपाने २०१२-१३ ते फेब्रुवारी २०१६ अखेर मनपाने वसूल केलेली रक्कम वेळोवेळी शासकीय कोषागारात भरणा केली आहे. त्यामुळे मनपाकडे जेमतेम २ कोटींची थकबाकी आहे. त्यातच जिल्हाधिकार्यांकडील ९ मार्च २०१६ रोजीच्या पत्रानुसार मनपाला मुद्रांक शुल्काची प्राप्त १ कोटी ९२ लाखांची रक्कम महाराष्ट्र शिक्षण कर व रोहयो करापोटी शासकीय कोषागार यांच्याकडे वर्ग केली असल्याचे कळविले आहे. त्यामुळे मनपाकडे केवळ १६ लाख रुपयांची थकबाकी असताना मनपाला मूलभूत सुखसुविधा पुरविण्यासाठी प्राप्त ५ कोटी व रस्ता अनुदानासाठीची ३ कोटी ७५ लाखांची अशी ८ कोटी ७५ लाखांची रक्कम तहसीलदार यांच्याकडे परस्पर वर्ग करण्यात आली आहे. ती रक्कम परत विकास कामांसाठी मनपाच्या खात्यावर वर्ग करण्याची मागणी केली आहे.