अनाथ भावा-बहिणीचं मोदींना पत्र, 96 हजाराच्या जुन्या नोटा बदलण्याची विनंती

By admin | Published: March 26, 2017 07:38 AM2017-03-26T07:38:59+5:302017-03-26T14:41:07+5:30

राजस्थानच्या कोटामध्ये एका अनाथाश्रमात राहणा-या भावा-बहिणीने पंतप्रधान मोदींना पत्र लिहून 96 हजार 500 रूपयांच्या जुन्या नोटा बदलवण्याची विनंती केली आहे.

A letter to the father-in-law of the orphans and sister, requesting change of 96 thousand old notes | अनाथ भावा-बहिणीचं मोदींना पत्र, 96 हजाराच्या जुन्या नोटा बदलण्याची विनंती

अनाथ भावा-बहिणीचं मोदींना पत्र, 96 हजाराच्या जुन्या नोटा बदलण्याची विनंती

Next
>ऑनलाइन लोकमत
कोटा, दि. 26 - राजस्थानच्या कोटामध्ये एका अनाथाश्रमात राहणा-या भावा-बहिणीने पंतप्रधान मोदींना पत्र लिहून 96 हजार 500 रूपयांच्या जुन्या नोटा बदलवण्याची विनंती केली आहे.  हे पैसे त्यांच्या वडिलोपार्जित घरात महिन्याच्या सुरूवातीला सापडले आहेत. पण आता नोटा बदवण्यासाठी कोणताच मार्ग नसल्याने या दोघांनी पंतप्रधानांना हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे.
 
बॅंकामध्ये जुन्या नोटा बदलण्याची मुदत संपली आहे. या अनाथ भाऊ-बहिणींमध्ये भाऊ 16 वर्षाचा असून बहिण 12 वर्षाची आहे. 
रिझर्व बॅंक ऑफ इंडियाने नोटा बदलवण्यासाठी नकार दिल्यानंतर त्यांनी मोदींना विनंती केल्याचं कोटा येथील बाल कल्याण समिति (सीडब्ल्यूसी) चे अध्यक्ष हरीश गुरुबख्शानी यांनी सांगितलं. त्यांच्या आईने आयुष्यभर हे पैसे सांभाळून ठेवले होते. भावाला हे पैसे बहिणीच्या नावे एफडी करायचे आहेत.  
 
या मुलांची आई पूजा बंजारा  ही मजदूर होती. 2013 मध्ये त्यांचा खून झाला होता. तर वडील राजू बंजारा यांचा आधीच मृत्यू झालेला आहे. आईच्या मृत्यूनंतर दोघंही एका अनाथाश्रमात राहतात. काही दिवसांपूर्वी एका समुपदेशन कार्यक्रमात या मुलांनी सरवदा गाव आणि आरके पुरम परिसरात वडिलोपार्जित घर असल्याचं सांगितलं. त्यानंतर या महिन्याच्या सुरूवातीला सीडब्ल्यूसीच्या निर्देशानुसार सरवदा येथील घराची झडती घेतली तेव्हा तेथे एका बॉक्समध्ये काही दागिने आणि 96 हजार 500 रूपये सापडले. 
सीडब्ल्यूसीने 17 मार्चला  रिझर्व बॅंक ऑफ इंडियाला एक पत्र लिहून नोटा बदलण्याची विनंती केली होती, मात्र, 22 मार्चला बॅंकेने ई-मेल करून जुन्या नोटा बदलण्याची मुदत संपली असल्याने नोटा बदलता येणार नसल्याचं सांगितलं.  

Web Title: A letter to the father-in-law of the orphans and sister, requesting change of 96 thousand old notes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.