आत्महत्याग्रस्त कुटुंबातील २५० मुलांचे मोफत शिक्षण उपसचिवांचे पत्र : सातार्‍याच्या जनता शिक्षण संस्थेचा पुढाकार

By admin | Published: April 29, 2016 12:29 AM2016-04-29T00:29:08+5:302016-04-29T00:29:08+5:30

जळगाव : नापिकी, कर्जबाजारीपणा यामुळे आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटुंबातील २५० मुलांच्या मोफत शिक्षणासाठी जनता शिक्षण संस्था, वाई, जि.सातारा यांनी पुढाकार घेतला आहे. जिल्‘ातील आत्महत्याग्रस्त कुटुंबातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देऊन या उपक्रमाचा लाभ द्यावा अशी सूचना उपसचिवांनी जिल्हा प्रशासला पाठविलेल्या पत्राद्वारे केली आहे.

Letter of Free Education Subcategories for 250 children of Suicidal Families: Janata Education Society's initiative of Satara | आत्महत्याग्रस्त कुटुंबातील २५० मुलांचे मोफत शिक्षण उपसचिवांचे पत्र : सातार्‍याच्या जनता शिक्षण संस्थेचा पुढाकार

आत्महत्याग्रस्त कुटुंबातील २५० मुलांचे मोफत शिक्षण उपसचिवांचे पत्र : सातार्‍याच्या जनता शिक्षण संस्थेचा पुढाकार

Next
गाव : नापिकी, कर्जबाजारीपणा यामुळे आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटुंबातील २५० मुलांच्या मोफत शिक्षणासाठी जनता शिक्षण संस्था, वाई, जि.सातारा यांनी पुढाकार घेतला आहे. जिल्‘ातील आत्महत्याग्रस्त कुटुंबातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देऊन या उपक्रमाचा लाभ द्यावा अशी सूचना उपसचिवांनी जिल्हा प्रशासला पाठविलेल्या पत्राद्वारे केली आहे.
जनता शिक्षण संस्थेेचे मुख्य सचिवांना पत्र
सातारा येथील जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रतापराव भोसले यांनी महाराष्ट्राचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांना पत्र पाठविले आहे. त्यात महाराष्ट्रातील आत्महत्या केलेल्या शेतकर्‍यांच्या मुलांना मोफत शिक्षण देण्याबाबत मदत करण्याची इच्छा असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.
२५० विद्यार्थ्यांना मिळणार मोफत शिक्षण
वाई येथील जनता शिक्षण संस्थेच्या किसन वीर महाविद्यालयात कला, वाणिज्य, विज्ञान व बी.सी.ए. अशा चार ज्ञानशाखांमार्फत तसेच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या केंद्रामार्फत शिक्षण दिले जात आहे. या ठिकाणी ११ वी ते एमए, एम.कॉम व एम.एस्सी पर्यंतच्या शिक्षणाची व्यवस्था आहे. सध्या दुष्काळी परिस्थितीत अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत. त्यामुळे अशा कुटुंबातील मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी सर्व जातीधर्माच्या २५० गरजू विद्यार्थ्यांना पुढील दोन वर्ष या महाविद्यालयात मोफत शिक्षण देण्यासाठी संस्थेेने पुढाकार घेतला आहे.
वसतीगृहात राहण्याची व्यवस्था मोफत
या महाविद्यालयात प्रवेश देण्यात येणार्‍या २५० विद्यार्थ्यांच्या चहापाणी, नास्ता, भोजन, पुस्तके, गणवेश, वैद्यकीय तपासणी तसेच राहण्याची व्यवस्था संस्थेतर्फे मोफत करण्यात येणार आहे. आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांची संपूर्ण माहिती व वर्तणूकीच्या दाखल्यासह संस्थेकडे पाठविण्याचे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.
उपसचिवांनी केली जिल्हा प्रशासनाला सूचना
जनता शिक्षण संस्थेतर्फे मदतीसाठी पुढाकार घेण्यात आल्यानंतर मुख्य सचिवांनी याबाबत सर्व जिल्हाधिकार्‍यांना आपल्या जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त कुटुंबातील मुलांना शिक्षणासाठी प्रोत्साहन द्यावे याबाबत आदेश काढले आहे. त्यानुसार महसूल व वनविभागाचे उपसचिव अशोक आत्राम यांनी लेखी आदेश जिल्हा प्रशासनाला पाठवून त्याबाबतचा अहवाल मागविला आहे.

Web Title: Letter of Free Education Subcategories for 250 children of Suicidal Families: Janata Education Society's initiative of Satara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.