जानेवारीत पाणी सोडण्यासाठी दिले पत्र
By admin | Published: December 8, 2015 01:52 AM2015-12-08T01:52:30+5:302015-12-08T01:52:30+5:30
सोलापूर :
Next
स लापूर : सोलापूरला पिण्यासाठी जानेवारीमध्ये उजनीतून पाणी सोडण्याबाबत पाटबंधारे खात्याला पत्र देण्यात आले आहे. औज बंधार्यात 20 जानेवारीपर्यंत पुरेल इतपत पाणीसाठा आहे. त्यामुळे पाण्याची पुढील पाळी मिळावी म्हणून महापालिकेने आतापासूनच पाठपुरावा सुरू केला आहे. सध्या शहरात पाच दिवसाआड पाणी सोडण्यात येत असल्यामुळे नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. उन्हाळय़ात यापेक्षा भयानक पाणीटंचाई जाणवेल या भीतीने आतापासून ही खबरदारी घेण्यात आली आहे. पाच दिवसाआड पाणी पुरवठय़ामुळे औज बंधार्यातील पाणी दोन महिने पुरेल अशी शक्यता आहे. पण पाणी सोडण्यास विलंब होऊ नये म्हणून आतापासूनच पाठपुरावा हवा अशी सूचना आयुक्त काळम?पाटील यांनी केल्याने पाणी पुरवठा विभागाने पाटबंधारे खात्याला पत्र पाठविले आहे. दरम्यान एनटीपीसीच्या जलवाहिनीचे काम डिसेंबरअखेर पूर्ण झाल्यास नव्या वर्षात या वाहिनीतून पाणी मिळेल अशी आशा आहे. त्यामुळे हे काम झाल्यास उजनीतून पाणी सोडण्याची वेळ येणार नाही अशी स्थिती आहे.