रेशनिंगवरील साखरेची सबसिडी बंद न करण्यासाठी केजरीवालांचं मोदींना पत्र
By admin | Published: June 14, 2017 04:47 PM2017-06-14T16:47:11+5:302017-06-14T16:47:46+5:30
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पत्र लिहून बीपीएल कुटुंबीयांना साखरेवर सबसिडी पुन्हा देण्याची मागणी केली
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 14 - दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पत्र लिहून बीपीएल कुटुंबीयांना साखरेवर सबसिडी पुन्हा देण्याची मागणी केली आहे. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया म्हणाले, केंद्र सरकारनं बीपीएल कुटुंबीयांसाठी साखरेची सबसिडी बंद केली आहे. अंत्योदय कुटुंबीयांना मिळणा-या साखरेची मात्रा सहा किलो घटवून एक किलो करण्यात आली आहे. त्याच पार्श्वभूमीवर केजरीवालांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून गरिबांची सबसिडी बंद न करण्याचे आवाहन केलं आहे.
केजरीवाल म्हणाले, देशभरात रेशन दुकानांवर गरिबांना जे स्वस्त धान्य मिळते, त्यावर केंद्र सरकार सबसिडी देते. आता काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारनं रेशन दुकानांवर गरिबांना देण्यात येणारी स्वस्त साखरेवरील सबसिडी बंद केली आहे. केजरीवाल म्हणाले, हा निर्णय मोदी सरकारच्या नेतृत्वाखालील कॅबिनेटमध्ये घेण्यात आला आहे. त्यावर केजरीवालांनी मोदींना पत्र लिहून गरिबांचे हित लक्षात घेऊन सबसिडी संपवण्याचा निर्णय मागे घ्यावा, अशी विनंती केली आहे. गेल्या काही दिवसांपासून बेरोजगारीही वाढली आहे. त्यामुळे गरिबांना सबसिडी न मिळाल्यास त्यांची दोन्ही बाजूंनी कोंडी होईल, असंही केजरीवाल म्हणाले आहेत.