'त्या' जमिनीवर कब्रस्तान, राम मंदिर ट्रस्टला मुस्लिमांचे पत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2020 02:34 PM2020-02-19T14:34:20+5:302020-02-19T14:42:10+5:30

देशातील सर्व हिंदू-मुस्लिमांनी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा सन्मान केला आहे.

Letter From Nine Muslim Of Ayodhya To Ram Mandir Trust Says Cemetery Was At 5 Acre Land | 'त्या' जमिनीवर कब्रस्तान, राम मंदिर ट्रस्टला मुस्लिमांचे पत्र

'त्या' जमिनीवर कब्रस्तान, राम मंदिर ट्रस्टला मुस्लिमांचे पत्र

Next
ठळक मुद्दे'कब्रच्या नावाखाली अडथळा आणला जात आहे'इक्बाल अन्सारींनी सांप्रदायिक सलोख्याचा दिला सल्ला 'ज्याठिकाणी शंख वाजतो आणि पूजा केली जात आहे, त्याठिकाणाचे स्मशान किंवा कब्रस्तान सर्व शुद्ध होते'

अयोध्या : राम मंदिर उभारणीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असताना अयोध्येतील नऊ मुस्लिमांनी राम जन्मभूमी परिसरात नवीन वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. या मुस्लिमांनी 'श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र' ट्रस्टला पत्र लिहिले आहे. यामध्ये म्हटले आहे की, एकूण 67 एकरमधील 5 एकर जमीन कब्रस्तानची आहे. दरम्यान, या मुस्लीम लोकांच्या दाव्यावर बाबरीचे पक्षकार राहिलेले इक्बाल अन्सारी यांनी सांप्रदायिक सलोख्याचा सल्ला दिला आहे. 

देशातील सर्व हिंदू-मुस्लिमांनी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा सन्मान केला आहे. आता अशाप्रकारे पत्र लिहून सांप्रदायिकरित्या एक नवीन वाद निर्माण करण्याचा हा प्रयत्न असल्याचे इक्बाल अन्सारी यांनी म्हटले आहे. तसेच, याप्रकरणी रामलल्लाचे मुख्य पुजारी आचार्य सतेंद्र दास यांनी सांगितले की, "67 एकर जमिनीवर कोणती कब्र नाही आहे. त्याठिकाणी ऋषींची समाधी होती. कब्रच्या नावाखाली अडथळा आणला जात आहे. ज्याठिकाणी शंख वाजतो आणि पूजा केली जात आहे, त्याठिकाणाचे स्मशान किंवा कब्रस्तान सर्व शुद्ध होते." 

विश्व हिंदू परिषदचे प्रवक्ता शरद शर्मा यांनी सांगितले की, "जे राम मंदिर उभारणीत विविध प्रकारे अडथळा निर्माण करत होते. ते सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर निराश झाले आहेत. हे लोक आता जे सांगत आहेत, त्यासंबंधी काहीच निशाणी 67 एकर जमिनीवर नाही आहे. गेल्या कित्येक वर्षांत मंदिरासाठी झालेल्या संघर्षात हजारो संतानीही आपल्या प्राणांची आहुती दिली आहे. अशावेळी जर ज्याठिकाणी तथ्यहीन कब्रस्तान म्हटले जात आहे, तर त्याला संत शहिदा म्हणू शकतो." 

दरम्यान, राम मंदिराच्या उभारणीसाठी केंद्र सरकारने 5 फेब्रुवारीपूर्वी ट्रस्ट स्थापन करावा तसेच मुस्लिमांना मशिदीसाठी अयोध्येत 5 एकर जागा द्यावी, असे सुप्रीम कोर्टाने सांगितले होते. त्यानुसार केंद्र सरकारने गेल्या काही दिवसांपूर्वी 'श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र' ट्रस्टची स्थापना केली. 

Up Cm Yogi Adityanath Asked 11 Rupees And Stones For Every Family For Ram Temple | भव्य राम मंदिरासाठी प्रत्येक घरातून एक वीट अन् ११ रुपये द्यावेत; मुख्यमंत्र्यांचं लोकांना आवाहन

'श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र' मधील 15 सदस्यांची नावे ...
1. के परासरन (सुप्रीम कोर्टातील वकील)
2. शंकराचार्य वासुदेवानंद सरस्वतीजी (प्रयागराज)
3. जगतगुरु मधवाचार्य स्वामी (कर्नाटकमधील पेजावर मठाचे पीठाधीश्वर)
4. युगपुरुष परमानंदजी महाराज (अखंड आश्रम प्रमुख, हरिद्वार)
5. स्वामी गोविंद देव गिरी (प्रवचनकर्ता)
6. विमलेंद्र मोहन प्रताप मिश्र (अयोध्या राजपरिवाराचे वंशज)
7. डॉ. अनिल मिश्र (होमिओपॅथिक डॉक्टर)
8. कामेश्वर चौपाल (पटना)
9. महंत दिनेंद्र दास (निर्मोही आखाडा , अयोध्या)
10. बोर्ड ऑफ ट्रस्टी द्वारा नियुक्त सदस्य
11. बोर्ड ऑफ ट्रस्टी द्वारा नियुक्त सदस्य
12. केंद्राचा प्रतिनिधी
13. राज्याचा प्रतिनिधी
14. अयोध्येचे जिल्हाधिकारी
15. ट्रस्टी द्वारा नियुक्त अध्यक्ष

Web Title: Letter From Nine Muslim Of Ayodhya To Ram Mandir Trust Says Cemetery Was At 5 Acre Land

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.