शिवतीर्थ रिकामे करून द्या पत्रयुद्ध : पोलीस दलाचे जि.प.ला पत्र
By admin | Published: September 7, 2016 09:28 PM2016-09-07T21:28:27+5:302016-09-07T21:28:27+5:30
जळगाव : गणेश विसर्जन मिरवणुकीसंबंधी जिल्हा परिषदेने आपल्या अखत्यारिमधील शिवतीर्थ मैदान रिकामे करून द्यावे व सहकार्य करावे, अशा आशयाचे पत्र जिल्हा पोलीस दलाने जिल्हा परिषदेच्या सीईओ यांना दिले आहे. परंतु या मैदानावर सध्या आनंद मेळा सुरू आहे. त्यांच्याकडून भाडे आगाऊ स्वरुपात घेतले आहे. त्यांना लागलीच मैदान रिकामे करण्याचे आदेश देणे कसे शक्य आहे, असे उत्तर देण्याची तयारी जि.प.प्रशासनाने सुरू केली आहे.
Next
ज गाव : गणेश विसर्जन मिरवणुकीसंबंधी जिल्हा परिषदेने आपल्या अखत्यारिमधील शिवतीर्थ मैदान रिकामे करून द्यावे व सहकार्य करावे, अशा आशयाचे पत्र जिल्हा पोलीस दलाने जिल्हा परिषदेच्या सीईओ यांना दिले आहे. परंतु या मैदानावर सध्या आनंद मेळा सुरू आहे. त्यांच्याकडून भाडे आगाऊ स्वरुपात घेतले आहे. त्यांना लागलीच मैदान रिकामे करण्याचे आदेश देणे कसे शक्य आहे, असे उत्तर देण्याची तयारी जि.प.प्रशासनाने सुरू केली आहे. शिवतीर्थ मैदानावर ८ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर या कालावधीसाठी आनंद मेळा भरविण्यास परवानगी देण्यात आली आहे. व्यावसायिक दरात जि.प.ने हे मैदान आनंद मेळा आयोजकांना भाडे तत्त्वावर दिले आहे. प्रतिदिन २५ हजार रुपये अशा दरात भाडे आकारले असून, त्याची रक्कम जि.प.ने घेतली आहे. पोलिसांचे मिरवणुकांचे कारणपोलीस दलाने गणेश विसर्जन मिरवणुकीसंबंधी वाहनांची व्यवस्था, इतर मुद्दे लक्षात घेता हे मैदान रिकामे करून द्यावे, असे पत्र जि.प.प्रशासनाला दिले आहे. मंगळवारी हे पत्र जि.प.सीईओ यांच्या कार्यालयात प्राप्त झाले. या पत्रासंबंधी काय उत्तर द्यावे, याबाबत मंगळवारी सायंकाळी सीईओ व उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यात चर्चा झाली. मैदानावर सध्या आनंद मेळा सुरू आहे. त्याच्याकडून भाडे आकारले आहे, असे उत्तर जि.प.प्रशासन पोलीस दलास देणार आहे. मैदान देण्याबाबत स्पष्ट नकार दिला जाणार नाही, असे यासंदर्भात उपमुख्य कार्यकारी अधिकारी नंदकुमार वाणी म्हणाले.