बडे काम की चीज! LIC ने आणली नवी पॉलिसी; आयुष्यभर देणार उत्पन्न
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2020 05:18 PM2020-08-26T17:18:50+5:302020-08-26T17:27:33+5:30
LIC launches Jeevan Akshay-VII annuity plan कोणत्याही अॅन्युईटी स्कीममध्ये एकरकमी गुंतवणूक केल्यास त्यानंतर एक निश्चित उत्पन्न मिळत राहते. ही कमाई आयुष्यभर होत राहते.
देशाची सर्वात मोठी आणि सरकारी विमा कंपनी भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) ने एक खास पॉलिसी लाँच केली आहे. या पॉलिसीचे नाव जीवन अक्षय-7 (प्लॅन नंबर 857) आहे. या प्लॅननुसार तुम्ही गुंतवणूक केल्यावर आयुष्यभर कमाई करू शकणार आहात. चला जाणून घेऊयात या पॉलिसीबाबत.
एलआयसीची जीवन अक्षय-7 (Jeevan Akshay- VII) ही एकरकमी नॉन-लिंक्ड, नॉन-पार्टिसिपेटिंग आणि पर्सनल अॅन्युईटी स्कीम आहे. तुमच्या माहितीसाठी कोणत्याही अॅन्युईटी स्कीममध्ये एकरकमी गुंतवणूक केल्यास त्यानंतर एक निश्चित उत्पन्न मिळत राहते. ही कमाई आयुष्यभर होत राहते.
या पॉलिसीमध्ये वार्षिक, तिमाही आणि मासिक हप्ता देण्याचे प्रकार उपलब्ध आहेत. कमीतकमी अॅन्युईटी ही वर्षाला 12000 रुपयांपासून सुरु होते. पॉलिसी सुरु होताच अॅन्युईटी दरांची गॅरंटी दिली जाते. या पॉलिसीला ऑनलाईन किंवा ऑफलाईन दोन्ही प्रकारांत खरेदी करता येणार आहे. या प्लॅनचे कमीतकमी खरेदी मूल्य एक लाख रुपये आहे. येथे अधिकाधिक खरेदी मूल्याची कोणतीही मर्यादा नाहीय.
हा प्लॅन 30 वर्ष ते 85 वर्षे वयाच्या लोकांसाठी उपलब्ध आहे. दिव्यांग व्यक्तींसाठी देखील ही योजना घेता येणार आहे. महत्वाचे म्हणजे या योजनेत एकाच कुटंबातील दोन वंशज (आजोबा-आजी, आई-वडील, मुले, नातू-नात) पती-पत्नी किंवा भावा बहिणीमध्ये जॉईंट लाईफ अॅन्युईटी घेतली जाऊ शकते. पॉलिसी जारी केल्यानंतर तीन महिन्यांनी त्यावर कर्जाची सुविधाही मिळणार आहे. याचा अर्थ पॉलिसी धारक कर्जदेखील घेऊ शकणार आहे. ही पॉलिसी 25 ऑगस्टपासून सुरु झाली आहे.
अन्य महत्वाच्या बातम्या...
शेवटी आयआयटीच ती! कारसाठी बनविली जबरदस्त बॅटरी; एका चार्जिंगमध्ये 1600 किमीची रेंज
CoronaVirus News चीनला भिडला! छोट्याशा देशाने कोरोनावर लस बनविली; साईड इफेक्ट शून्य
एकटीला पाहून साधुने बलात्काराचा प्रयत्न केला; मार्शल आर्ट मास्टर महिलेने धु धु धुतले
सदाभाऊ खोत यांना कोरोनाची लागण; झाले क्वारंटाईन
किम जोंग उन जिवंत! बोलावली आपत्कालीन बैठक; उत्तर कोरियाकडून पुन्हा फोटोद्वारे 'दर्शन'
CoronaVirus News लस टोचल्यानंतरही कोरोनाची लागण होणार? तेलंगानातील रिपोर्ट चिंता वाढविणारा
CoronaVirus News: गंभीर इशारा! थंडीत लस अशक्य; पण कोरोनाची दुसरी मोठी लाट येण्याची शक्यता
कौन बनेगा? तुम्ही देखील बनू शकता करोडपती; रोज फक्त 30 रुपये बाजुला काढा