लिड

By Admin | Published: April 10, 2015 11:30 PM2015-04-10T23:30:04+5:302015-04-10T23:30:04+5:30

फोटो - १०बीईडीपी१७

Lid | लिड

लिड

googlenewsNext
टो - १०बीईडीपी१७
ओळी : मृत श्रीकिसन शिंदे

मुलीच्या प्रियकराचा खून करून मृतदेह ठाण्यात
बीड : आई, भावाला अटक
सिरसाळा (जि़ बीड) : मुलीच्या अनैतिक प्रेमप्रकरणातून तिच्या प्रियकराचा खून करून त्याचा मृतदेह कुटुंबियांनी थेट परळी शहर पोलीस ठाण्यात नेल्याची घटना गुरुवारी मध्यरात्री घडली. श्रीकिसन नारायण शिंदे (४०) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी मुलीची आई मन्नाबी हसन पठाण व भाऊ मैनोद्दीन हसन पठाण या दोघांना अटक करण्यात आली आहे.
परळी तालुक्यातील सिरसाळा मार्गावर असणार्‍या पौळ पिंप्री येथील एका पंचेवीस वर्षीय मुलीशी त्याचे प्रेमसंबंध जुळून आले. शिंदे हा गावामध्ये अवैधरित्या दारूविक्री करत होता. या प्रेम प्रकरणास मुलीची आई मन्नाबी हसन पठाण व भाऊ मैनोद्दीन हसन पठाण यांचा प्रचंड विरोध होता. मुलीच्या आईने गावात बैठक बोलावून किसनने मुलीचा नाद सोडून द्यावा, अशी मागणी केली होती. त्यानंतर त्या मुलीचा विवाह केज तालुक्यातील आडस येथील एका तरूणाशी झाला होता. मात्र ती काही दिवसच सासरी नांदली. नंतर ती पुन्हा माहेरी परतली व शिंदे याच्यासोबत असलेले अनैतिक संबंध पुन्हा सुरू झाले.
गुरुवारी रात्री मन्नाबी हसन पठाण यांच्या घरी पाहुणे आले होते. त्यावेळी सर्वजण गप्पा मारीत बसले होते. मध्येच त्यांची मुलगी उठून बाहेर गेेली. बराच वेळानंतर ती परतली तेव्हा आई व भावाने कोठे गेली होतीस अशी विचारणा तिला केली. तिने उत्तर न दिल्याने आई , भाऊ व पाहुण्यांनी तिला काठीने बेदम मारहाण केली. यात ती बेशुद्ध झाली. त्यानंतर तिच्या कुटुंबियांनी बाहेर येऊन पाहिले असता तेथे श्रीकिसन शिंदे दिसला. संतापलेल्या मुन्नाबी हसन पठाण , मैनोद्दीन पठाण व पाहुणा (नाव उपलब्ध नाही) यांनी त्याला काठीने डोक्यात मारहाण केली. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. नंतर पाहुण्याने आणलेल्या ऑटोमध्ये त्याचा मृतदेह टाकून थेट परळी शहर ठाणे गाठले. तिघांनीही आपला हा प्रकार पोलीसांना सांगितला. त्या मुलीवर परळी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. माजलगावचे उपविभागीय अधिकारी एम.आय. शेख यांनी पौळपिंप्रीस भेट दिली.श्रीकिसन शिंदे याची पत्नी मनिषा यांच्या फिर्यादीनुसार तिघांविरूद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास स.पो.नि. छबुराव सोनवणे करीत आहेत. (वार्ताहर)

Web Title: Lid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.