काय सांगता! पाकिस्तानच्या लेफ्टनंट कर्नलला दिला पद्मश्री पुरस्कार, १९७१ च्या युद्धात केली होती भारताची मदत
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2021 03:23 PM2021-11-11T15:23:47+5:302021-11-11T15:30:28+5:30
Padma Shri Award 2021 : मिलिट्रीशी संबंधित प्रकरण आणि बराच वाद असल्याने आतापर्यंत आपल्याला लेफ्टनंट कर्नल जाहिर यांच्या बहादुरीच्या किस्से माहीत नव्हते.
भारताच राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी काही दिवसांपूर्वीच पद्म पुरस्कारांनी लोकांना सन्मानित केलं. वेगवेगळ्या क्षेत्रातील योगदानासाठी काही लोकांना पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्म विभूषण पुरस्कारांनी सन्मानित केलं. यावेळी पाकिस्तानचे माजी लेफ्टनंट कर्नल काजी सज्जाद अली जाहिर यांनाही पद्मश्री पुरस्काराने (Padma Shri 2021) सन्मानित केलं.
लेफ्टनंट कर्नल काजी सज्जाद अली जाहिर यांची कहाणी इतक्या वर्षापर्यंत आपणा सर्वांपासून लपलेली होती. मिलिट्रीशी संबंधित प्रकरण आणि बराच वाद असल्याने आतापर्यंत आपल्याला लेफ्टनंट कर्नल जाहिर यांच्या बहादुरीच्या किस्से माहीत नव्हते.
लेफ्टनंट कर्नल जाहिर सियालकोटमध्ये पोस्टेड होते. पाकिस्तान सेनेचे अत्याचार आणि बांग्लादेशमध्ये होत असलेल्या मृत्यूच्या खेळाने त्यांना आतपर्यंत हलवून सोडलं होतं. त्यांना बांग्लादेशी नागरिकांची मदत करायची होती. मनात दृढ निश्चय करून ते पाकिस्तानातून भारतात पोहोचले.
भारतीय सेनेला वाटले पाक गुप्तहेर
लेफ्टनंट कर्नल जाहिर यांना भारतीय सेनेने पाकचा गुप्तहेर समजलं आणि पठाणकोटमध्ये बॉर्डर सिक्युरिटी फोर्स अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडून माहिती काढण्याचा प्रयत्न केला. कर्नल जाहिर यांनी काही कागदपत्रे दिली आणि भारतीय सेनेला विश्वास दिला की, ते गुप्तहेर नाहीत. आणि त्यांना भारतीय सेनेची मदत करायची आहे.
जेव्हा भारतीय सेनेला विश्वास बसला की, लेफ्टनंट कर्नल जाहिर यांच्याकडून कोणताही धोका नाही तेव्हा त्यांना दिल्लीतील एका सेफ हाऊसमध्ये पाठवण्यात आलं. तेथून ते बांग्लादेशला गेले आणि पाकिस्तानी सेनेचा मुकाबला करण्यासाठी बांग्लादेशच्या मुक्ती वाहिनीच्या सैनिकांना ट्रेनिंग दिलं.
इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार, लेफ्टनंट कर्नल जाहिर फार गर्वाने सांगतात की, पाकिस्तानात गेल्या ५० वर्षापासून त्यांची मृत्यूदंडाची शिक्षा ठरलेली आहे. बांग्लादेशने त्यांना बीर प्रोतीक स्वाधीनता पदकाने सन्मानित केलं आहे. आता भारताने त्यांना पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित केलं आणि त्यांच्या वीरतेला ओळख दिली