सीमीच्या प्रमुखासह 10 जणांना जन्मठेपेची शिक्षा

By admin | Published: February 27, 2017 06:27 PM2017-02-27T18:27:42+5:302017-02-27T18:55:30+5:30

बंदी घालण्यात आलेल्या सीमी संघटनेचा प्रमुख सफदर हुसैन नागोरी याच्यासह 10 जणांना 2008 मधील देशद्रोहाच्या प्रकराणात येथील विशेष कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सोमवारी सुनावली आहे.

Life imprisonment for 10 people including chief of SIMI | सीमीच्या प्रमुखासह 10 जणांना जन्मठेपेची शिक्षा

सीमीच्या प्रमुखासह 10 जणांना जन्मठेपेची शिक्षा

Next
>ऑनलाइन लोकमत
इंदोर, दि. 27 - बंदी घालण्यात आलेल्या सीमी संघटनेचा प्रमुख सफदर हुसैन नागोरी याच्यासह 10 जणांना 2008 मधील देशद्रोहाच्या प्रकराणात येथील विशेष कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सोमवारी सुनावली आहे. विशेष म्हणजे, सीमी संघटनेचे 11 ही आरोपी अहमदाबाद येथील साबरमती सेन्ट्रल जेलमध्ये असताना, त्यांना ही शिक्षा व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावण्यात आली. 
येथील विशेष कोर्टाचे न्यायधीश बी. के. पलौदा यांनी अकराही जणांना कलम 153 आणि 124 अंतर्गत देशद्रोही ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. सीमी संघटनेचा प्रमुख सफदर हुसेन याच्यासह हाफिज हुसैन, आमील परवेझ, शिवली, कमरुद्दीन, शहादुली, कमरान, अन्सर, अहमद बेग, यासीन आणि मुनरोझ अशी शिक्षा झालेल्यांची नावे आहेत. 
दरम्यान, या सर्व आरोपींवर प्रक्षोभक भाषण करणे, देश विरोधी साहित्य जवळ बाळगणे आणि ट्रेनिंग कॅम्प चालवण्याचा आरोप करण्यात आला होता. 2008 मध्ये त्यांना अटक केल्यानंतर त्यांच्याकडून मोठ्याप्रमाणात हत्यारे आणि दारूगोळा साठा जप्त करण्यात आला होता.

Web Title: Life imprisonment for 10 people including chief of SIMI

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.