परीक्षेत गैरप्रकार केल्यास जन्मठेप, १० कोटींचा दंड

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2023 11:13 AM2023-02-12T11:13:36+5:302023-02-12T11:14:09+5:30

उत्तराखंडमध्ये कायदा, स्वप्नातही कॉपी करणार नाही

Life imprisonment, fine of 10 crores for malpractice in examination | परीक्षेत गैरप्रकार केल्यास जन्मठेप, १० कोटींचा दंड

परीक्षेत गैरप्रकार केल्यास जन्मठेप, १० कोटींचा दंड

googlenewsNext

डेहराडून : राज्यातील स्पर्धा परीक्षांतील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी उत्तराखंड सरकारने इतिहासातील आतापर्यंतचा सर्वांत कठोर कायदा बनवला आहे. कायद्यातील तरतुदी ऐकल्यानंतर परीक्षेत कॉपी किवा इतर  गैरप्रकार करणे सोडा तसे करण्याचा कोणी स्वप्नातही विचार करणार नाही. कारण, दोषींना जन्मठेप व तब्बल १० कोटी रुपयांचा दंडही होऊ शकतो. 

शासनाने स्पर्धा परीक्षांमधील गैरप्रकार थांबविण्यासाठी जारी केलेल्या उत्तराखंड स्पर्धा परीक्षा अध्यादेशाला (भरतीत अनुचित साधनांना प्रतिबंध आणि निवारणाचे उपाय) राज्यपाल गुरमीत सिंग यांनी मंजुरी दिली आहे. यानंतर हा अध्यादेश कायदा बनला आहे.
उत्तराखंडमधील स्पर्धा परीक्षांमध्ये प्रश्नपत्रिका छापण्यापासून निकाल प्रकाशित करण्यापर्यंतच्या प्रक्रियेत गैरप्रकार करणाऱ्यांना आता जन्मठेपेसह १० कोटी रुपयांपर्यंत दंडाची शिक्षा होऊ शकते. अशा कृत्यांद्वारे मिळवलेली त्यांची मालमत्ताही जप्त करण्याची तरतूद या कायद्यात आहे. अध्यादेशाला मंजुरी दिल्याबद्दल मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी राज्यपालांचे आभार मानले. प्रत्येक स्पर्धा परीक्षेत कॉपी विरोधी कायदा लागू केला जाईल, असे ट्वीट केले आहे. 

nअलीकडच्या काही महिन्यांत राज्यात प्रश्नपत्रिका फुटण्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. 
nत्याविरुद्ध डेहराडूनमध्ये बेरोजगार तरुण मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले होते.

एखाद्या व्यक्तीने परीक्षा आयोजित करणाऱ्या संस्थेसोबत कट रचल्यास जन्मठेप व 
१० कोटी 
रुपयांपर्यंत दंड. 

 

Web Title: Life imprisonment, fine of 10 crores for malpractice in examination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.