पत्नीच्या खूनप्रकरणी पतीस जन्मठेप

By admin | Published: January 5, 2016 12:29 AM2016-01-05T00:29:22+5:302016-01-05T00:29:22+5:30

हॅलो ग्रामीणसाठी

Life imprisonment for wife's murder | पत्नीच्या खूनप्रकरणी पतीस जन्मठेप

पत्नीच्या खूनप्रकरणी पतीस जन्मठेप

Next
लो ग्रामीणसाठी

जळगाव : दुसर्‍या पत्नीशी झालेल्या वादातून अंगावर रॉकेल टाकून पहिल्या पत्नीला जाळून मारल्याच्या गुन्‘ात दिलीप सुखदेव गायकवाड (वय ३५ रा. वाघारी ता.जामनेर) या आरोपीस सोमवारी न्यायालयाने जन्मठेप व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. दंडाची रक्कम न भरल्यास सहा महिने कारावासही गायकवाडला भोगावा लागणार आहे. न्या.ए.के.पटनी यांच्या न्यायालयात याबाबत कामकाज झाले.
वाघारी येथील दिलीप सुखदेव गायकवाड याला दोन बायका होत्या. २८ मे २०१४ रोजी बायको तुळसाबाई हिचा सवत शोभाबाई हिच्याशी किरकोळ वाद झाला होता. त्यादिवशी दिलीप हा दारू पिऊन घरी आला. तेव्हा त्याला या दोघींमध्ये वाद झाल्याचे समजले. त्यातून त्याने रात्री तीन वाजता तुळसाबाई हिच्या अंगावर रॉकेल टाकून जाळले. नंतर उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. उपचार सुरू असताना दोन दिवसांनी ३० मे रोजी तिचा मृत्यू झाला होता. तुळसाबाई हिने मृत्युपूर्व जबाब पोलिसांकडे दिला होता तसेच वडील दानु काळू कुराडे (वय ५१ रा.चाळीसगाव) यांनाही घडलेला प्रकार सांगितला होता. सरकारपक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील केतन ढाके तर आरोपीकडून ॲड.के.डी.पाटील यांनी काम पाहिले.

Web Title: Life imprisonment for wife's murder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.