सुयोग्य जीवनशैलीमुळे आयुष्यमान उंचावते

By admin | Published: December 23, 2016 07:57 PM2016-12-23T19:57:08+5:302016-12-25T01:27:35+5:30

सुधीर शेतकर : शिक्षणशास्त्र महाविद्यालयात चर्चासत्र

Life improves lifestyles by improving lifestyles | सुयोग्य जीवनशैलीमुळे आयुष्यमान उंचावते

सुयोग्य जीवनशैलीमुळे आयुष्यमान उंचावते

Next

सुधीर शेतकर : शिक्षणशास्त्र महाविद्यालयात चर्चासत्र
नाशिक : माणसाची सुयोग्य जीवनपद्धती, आहारपद्धती, आशावादी दृष्टिकोन, नियमित व्यायाम, मनाची शांतता, स्वास्थ्यपूर्ण जगण्याची कला, शांत झोप या सर्व बाबी उच्च जीवनमानासाठी महत्त्वपूर्ण आहेत, असे प्रतिपादन अपोलो हॉस्पिटलचे कार्डियोलॉजिस्ट डॉ. सुधीर शेतकर यांनी कले. ॲड. विठ्ठलराव हांडे शिक्षणशास्त्र महाविद्यालयात आयोजित दोन दिवसीय चर्चासत्राच्या दुपारच्या सत्रात केले. शेतकर म्हणाले की, मानवी जीवन धकाधकीचे बनत चालले आहे. या धावपळीच्या युगात मानवाने स्वत:कडे लक्ष देण्याची गरज आहे. जीवनात विज्ञानवाद आणून वार्षिक शारीरिक तपासणी होणे गरजेचे आहे. आजार बळावल्यानंतर उपचार करण्यापेक्षा वेळीच प्रतिबंध केले, तर मानवी जीवन सुखी होईल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला. प्राचार्य चंद्रकांत बोरसे यांनी केले. याप्रसंगी डॉ. मंगेश जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी आभार प्रदर्शन प्रा. अनिता शेळके यांनी केले. यावेळी विविध जिल्‘ांतील प्राध्यापक उपस्थित होते.
कातारी शिकलकर समाजाच्या कार्याध्यक्षपदी करणसिंग बावरी
नाशिक : अखिल महाराष्ट्र कातारी शिकलकर समाज संघ नाशिक वार्षिक बैठक महाराणा प्रताप चौक पंचवटी येथे घेण्यात आली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र अध्यक्ष रामसिंग बावरी हे होते. यावेळी सर्व मताने नाशिक शहर कार्याध्यक्षपदी करणसिंग बावरी यांची नियुक्ती करण्यात आली. नाशिक शहराध्यक्ष कृष्णा भोड, उपाध्यक्ष विक्की राठोड व श्रीकांत खिची, खजिनदार शंकर खिची, सहखजिनदार भरत भोडं, सेेक्रेटरी विजय खिची व राहुल बावरी, सचिव विजय बावरी, व्यवस्थापक दीपक बेस व विजय खिची यांची निवड करण्यात आली. (फोटो)

Web Title: Life improves lifestyles by improving lifestyles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.