बोगद्यात कामगारांपर्यंत पोहोचली ‘लाइफलाइन’; लवकरच खुशाली कळणार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2023 05:31 AM2023-11-21T05:31:13+5:302023-11-21T05:31:22+5:30
खुशाली कळणार, मदत मिळणार
उत्तरकाशी : उत्तराखंडमधील उत्तरकाशी येथे बोगदा दुर्घटनेनंतर बचाव कार्यात सोमवारी मोठे यश मिळाले असून बोगद्याच्या ढिगाऱ्यातून बचावकर्त्यांनी सोमवारी सहा इंच रुंदीची पाइपलाइन पुढे ढकलली, ज्यामुळे आठ दिवस अडकलेल्या ४१ कामगारांना मोठ्या प्रमाणात अन्न आणि इतर आवश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यात मदत होईल. दरम्यान, मदत करण्यासाठी आंतरराष्ट्रीय बोगदातज्ज्ञ अर्नोल्ड डिक्स पोहोचले असून त्यांनी मजुरांना सुखरूप बाहेर काढण्याचा निर्धार बोलून दाखवला.
पंतप्रधान मोदींनीही घेतला आढावा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्याशी फोनवर बोलून सुरू असलेल्या बचाव कार्याचा आढावा घेतला. अडकलेल्या मजुरांच्या नातेवाइकांचा प्रवास, भोजन आणि निवासाचा खर्च उचलण्याची घोषणा उत्तराखंड सरकारने केली आहे.