LOC वर उजळले दिवे, जवानांनी साजरी केली दिवाळी

By admin | Published: October 30, 2016 09:45 AM2016-10-30T09:45:44+5:302016-10-30T09:45:44+5:30

देशाच्या सुरक्षेसाठी घरादारापासून दूर डोळ्यात तेल घालून पहारा देत असलेल्या या जवानांनी काल रात्री एलओसीवर दिवाळी साजरी केली.

Lights lit on LOC, soldiers celebrate Diwali | LOC वर उजळले दिवे, जवानांनी साजरी केली दिवाळी

LOC वर उजळले दिवे, जवानांनी साजरी केली दिवाळी

Next
ऑनलाइन लोकमत
जम्मू , दि. 30 -   देशभरात दिवाळी साजरी होत असताना काश्मीरमधील नियंत्रण रेषेवर मात्र तणावाचे वातावरण आहे. शस्त्रसंधीचे उल्लंघन करत पाकिस्तानकडून सातत्याने होत असलेल्या गोळीबाराला भारताचे जवान चोख प्रत्युत्तर देत आहेत. देशाच्या सुरक्षेसाठी घरादारापासून दूर डोळ्यात तेल घालून पहारा देत असलेल्या या जवानांनी काल रात्री एलओसीवर दिवाळी साजरी केली.
सीमेपलीकडून गोळीबार सुरू असतानाच  जम्मू आणि काश्मीरमधील आरएसपुरा विभागात बीएसएफच्या जवानांनी नियंत्रण रेषेवर पणत्या लावून दीपोत्सव राजरा केला. जम्मू आणि काश्मीर प्रमाणेच अन्य भागातही सीमेवर तैनात असलेल्या जवानांकडून दिवाळी साजरी करण्यात आली. 
 

Web Title: Lights lit on LOC, soldiers celebrate Diwali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.