Limka Book Of Records: खत्री नावाचा प्रेमळ माणूस, पक्षांसाठी बांधली तब्बल 2.5 लाख घरटी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2022 01:46 PM2022-02-08T13:46:23+5:302022-02-08T13:48:09+5:30

राकेश यांनी ऑनलाईन वेबिनारच्या माध्यमातून 10 लाख मुलांना पक्षांसाठी घरटे बांधण्याचे प्रशिक्षण दिलंय

Limka Book Of Records: A loving man named Rakesh Khatri built 2.5 lakh nests for birds | Limka Book Of Records: खत्री नावाचा प्रेमळ माणूस, पक्षांसाठी बांधली तब्बल 2.5 लाख घरटी

Limka Book Of Records: खत्री नावाचा प्रेमळ माणूस, पक्षांसाठी बांधली तब्बल 2.5 लाख घरटी

googlenewsNext

नवी दिल्ली - माणसांच्या इर्दगिर्द वावरणाऱ्या चिमण्या, पोपट, कबुतर, तितर, कोकिळा यांसारख्या पक्षांनाही घरट्यांची गरज असते. ऊन, पाऊस,  वारा यापासून संरक्षण करण्यासाठी माणसांप्रमाणेच पक्षांनाही एखादं घरटं हवं असतं. त्यामुळेच, एक एक काडी वेचून चिमणी आपलं घरटं बांधते. मात्र, पक्षांवर प्रेम करणारे दिल्लीतील अशोक विहारचे रहिवाशी राकेश खत्री यांनी आजपर्यंच अंदाजे तब्बल 2.5 लाख घरटी बांधली आहेत. त्यामुळेच, लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये त्यांचे नाव आले असून अनेक पुरस्कारांनी त्यांचा गौरवही करण्यात आला आहे.

राकेश यांनी ऑनलाईन वेबिनारच्या माध्यमातून 10 लाख मुलांना पक्षांसाठी घरटे बांधण्याचे प्रशिक्षण दिलंय. पक्षांची आवड आणि पक्षांसाठी घरटी बनविण्याच मनात इच्छा असल्यास या घरट्यांसाठी जास्त मेहनत किंवा पैसाही लागत नाही. पक्षांची देखभाल करण्यासाठी कुणीही नसतं, त्यामुळे माणसांप्रमाणेच त्यांनाही घरटं हवं असतं, असे राकेश म्हणतात. राकेश म्हणतात की, आयसीएसई बोर्डाच्या इयत्ता 4 थी कक्षेतील पाठ्यक्रमात त्यांच्यावर एक धडाही आहे. आजपर्यंत लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड, नॅशनल अवार्ड फॉर आउटस्टेंडिंग इफोर्ट्स इन सायंन्स अँड टेक्नोलॉजी, डॉ. के.के एचसीएफआय अवार्डनेही त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे.    
 

Web Title: Limka Book Of Records: A loving man named Rakesh Khatri built 2.5 lakh nests for birds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.