खासदार निधीतून रायबरेलीसाठी रेखा यांनी दिले २.५ कोटी रुपये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2017 03:02 AM2017-11-02T03:02:21+5:302017-11-02T03:03:00+5:30
अभिनेत्री व राज्यसभा सदस्य रेखा यांनी त्यांच्या खासदार निधीतून रायबरेलीसाठी २.५ कोटी रुपये दिले आहेत, असे बुधवारी अधिका-याने सांगितले. काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांचा रायबरेली हा लोकसभा मतदारसंघ आहे.
नवी दिल्ली : अभिनेत्री व राज्यसभा सदस्य रेखा यांनी त्यांच्या खासदार निधीतून रायबरेलीसाठी २.५ कोटी रुपये दिले आहेत, असे बुधवारी अधिका-याने सांगितले. काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांचा रायबरेली हा लोकसभा मतदारसंघ आहे.
या निधीतून रस्त्यांची बांधणी, पाणीपुरवठा आणि चांगल्या वीजपुरवठ्यासाठी नवे ट्रान्सफॉर्मर बसवले जातील. मंजूर झालेल्या १.४२ कोटी रुपयांतून १.०६ कोटी रुपये रेखा गणेशन यांच्याकडून मिळाले आहेत व राहिलेली रक्कम सुरू असलेल्या प्रकल्पांचे उपयोगिता प्रमाणपत्र सादर केल्यानंतर उपलब्ध होतील. राज्यसभेच्या सदस्याला त्याच्या पसंतीच्या मतदारसंघात खासदार निधीतून विकासकामांना मदत करता येते. रेखा यांनी सोनिया गांधी यांची भेट घेऊन रायबरेली मतदारसंघात खासदार निधीतून खर्च करण्याची इच्छा व्यक्त केली होती.