शनिपेठ दंगल बातमीला जोड

By admin | Published: February 22, 2016 07:28 PM2016-02-22T19:28:48+5:302016-02-22T19:28:48+5:30

अशी आहे फिर्याद

Link to Dangle news | शनिपेठ दंगल बातमीला जोड

शनिपेठ दंगल बातमीला जोड

Next
ी आहे फिर्याद
जातीवाचक शिवीगाळ केल्याच्या कारणावरून शनिपेठ भागातील गुरुनानकनगरात राहणारा तरूण रणजित अनिल चव्हाण यास आरोपी जाकीर, लल्ला, विक्की यांनी शिवीगाळ, दमदाटी करत मारहाण केली. जाकीरने त्याच्या कमरेचा प˜ा हातास गुंडाळून रणजितच्या डोक्यावर मारल्याने त्यास गंभीर दुखापत झाली. याबाबत शनिपेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असताना पोलीस ठाण्यासमोर दोन्ही गटातील जमाव चालून आला. जमावातील लोकांनी शिवीगाळ करत एकमेकांवर दगड, विटा, काचेच्या बाटल्या मारून फेकण्यास सुरुवात केली. हा प्रकार सुरू असताना पोलीस कर्मचार्‍यांनी जमावाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. परंतु जमावाने म्हणणे ऐकून न घेता पोलिसांवरदेखील दगडफेक केली. त्यात पोलीस कर्मचार्‍यांना दुखापत झाली. सरकारी कामातही अडथळा निर्माण झाला, असे पोलीस नाईक विजयकुमार सोनार यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. तपास सहायक पोलीस निरीक्षक संदीप पाटील करीत आहेत.
अटकेतील आरोपींना दोन दिवस पोलीस कोठडी
अटकेतील १२ आरोपींना शनिपेठ पोलिसांनी सोमवारी दुपारी अडीच वाजता न्यायाधीश आर.बी. ठाकूर यांच्या न्यायालयात हजर केले. सरकार पक्षातर्फे ॲड.आशा शर्मा यांनी बाजू मांडली. सदरच्या गुन्‘ातील इतर आरोपींना अटक करणे बाकी आहे, गुन्हा करण्याच्या मूळ हेतूचा शोध घ्यायचा आहे, आरोपींचा पूर्व नियोजित कट होता का? याची चौकशी करायची असल्याने आरोपींना पाच दिवस पोलीस कोठडी देण्याची मागणी युक्तिवादात केली. आरोपींकडून ॲड.राशीद पिंजारी, ॲड.कुणाल पवार, ॲड.नितीन नाईक यांनी काम पाहिले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून न्या. ठाकूर यांनी आरोपींना २४ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
न्यायालयात नातेवाईकांची गर्दी
आरोपींना न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती. पोलिसांनी आरोपींना सुरुवातीला न्या.आर.बी. ठाकूर यांच्या न्यायालयाच्या दालनासमोर उभे केले होते. मात्र, नागरिकांची गर्दी वाढत असल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये, म्हणून पोलिसांनी आरोपींना लागलीच प्रतीक्षालयात नेले. त्याठिकाणी आरोपींचे नातेवाईक त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होते.
शालेय दाखल्यावरून वयाची पुष्टी
या गुन्‘ात सहभागी असलेला अलफैज सैफुद्दीन शेख याला अटक केल्यावर तो अल्पवयीन असल्याचे सांगितले जात होते. मात्र, न्यायालयात हजर करण्यापूर्वी पोलिसांनी त्याचा शालेय दाखला मागवून त्याच्या वयाची खात्री केली. त्यात तो १८ वर्ष १० दिवसांचा असल्याचे स्पष्ट झाल्याने गुन्‘ात त्याचे नाव समाविष्ट करण्यात आले.

Web Title: Link to Dangle news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.