माणसांची शिकार केली म्हणून सिंहांना कैद

By admin | Published: June 16, 2016 11:20 AM2016-06-16T11:20:11+5:302016-06-16T11:23:11+5:30

अहमदाबादमधील सासणमध्ये माणसांची शिकार केली म्हणून हत्येसाठी आरोपी ठरलेल्या एकूण 18 सिंहांना कैदेत ठेवण्यात आलं आहे

Lions imprisoned as people hunted | माणसांची शिकार केली म्हणून सिंहांना कैद

माणसांची शिकार केली म्हणून सिंहांना कैद

Next
ऑनलाइन लोकमत - 
अहमदाबाद, दि. 16 - जनावराची शिकार केली म्हणून एखाद्या व्यक्तीला अटक होणे यात काही नवीन नाही. पण माणसाची शिकार केली म्हणून जनावराला कैद झाल्याची कधी तुम्ही ऐकलयं का ? हे कसं काय शक्य आहे म्हणत असाल तर थांबा...कारण सासणमध्ये माणसांची शिकार केली म्हणून सिंहांना कैद करण्यात आलं आहे. सिंहाना कैद करण्याची ही पहिलीच घटना आहे. एक, दोन नव्हे तर हत्येसाठी आरोपी ठरलेल्या एकूण 18 सिंहांना कैदेत ठेवण्यात आलं आहे. 
 
अहमदाबादजवळील आबंरडी, कोदिया आणि दूधिया गावांमध्ये गेल्या काही दिवसांत सिंहांनी दहशत माजवली आहे. फक्त 3 महिन्यांत सिंहांनी 4 लोकांची शिकार केली आहे. सिंहांच्या हल्ल्यात एकूण 6 जण जखमी झाले आहेत. त्यामुळे वनविभागाने कारवाई करत 18 सिंहांना पकडलं असून सगळ्यांना कैदेत ठेवलं आहे. विशेष म्हणजे तपासानंतर 18 सिंहांपैकी जे सिंह नरभक्षक असतील, तसंच ज्यांनी माणसांची शिकार केली आहे, त्यांना दोषी ठरवून आजन्म कैदेत ठेवलं जाईल.
 
(व्हिडिओ - वाघिणीने केली बिबट्याची शिकार)
 
कोणत्या सिंहाने शिकार केली ओळखायच कसं यासाठी शिकार झालेल्या सिंहांच्या पायाचे ठसे घेतले जाणार आहेत. ज्या सिंहांच्या पायाच्या ठश्यांशी ते जुळतील त्यांना दोषी ठरवून आजन्म कैदेत ठेवलं जाणार आहे. सिंहांच्या विष्ठेचंही परीक्षण केलं जाईल. सिंहांच्या विष्ठेत मानवी मांस, शिकार झालेल्या माणसाचे कपडे आणि अवशेषांची तपासणी होईल. त्यानंतर बाकीच्या सिंहांना पुन्हा गीर अभयारण्यात सोडण्यात येईल.
 

Web Title: Lions imprisoned as people hunted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.