रेल्वे प्रवासातही आता ऐका एफएम रेडिओ
By admin | Published: July 25, 2016 05:23 AM2016-07-25T05:23:52+5:302016-07-25T05:23:52+5:30
रेल्वे प्रवासाचा आनंद आता आपली आवडती गाणी व संगीत ऐकण्यासह प्रवाशांना लुटता येणार आहे. लोकप्रिय एफएम रेडिओ स्टेशन्स प्रवासी आता डब्यात लावू शकतील.
नवी दिल्ली : रेल्वे प्रवासाचा आनंद आता आपली आवडती गाणी व संगीत ऐकण्यासह प्रवाशांना लुटता येणार आहे. लोकप्रिय एफएम रेडिओ स्टेशन्स प्रवासी आता डब्यात लावू शकतील.
प्रवासात करमणूक व्हावी, या उद्देशाने रेल्वे मंत्रालय रेल रेडिओ सेवा सुरू करणार आहे. राजधानी, शताब्दी, दुरांतोसह ही सेवा एक हजार रेल्वे आणि एक्स्प्रेस व पॅसेंजर रेल्वेंमध्ये उपलब्ध केली जाईल. प्रवाशांना केवळ डब्यांमध्येच लोकप्रिय गाणी व संगीत ऐकायला मिळेल असे नाही, तर दर तासाला रेल्वेशी संबंधित ताजी माहितीही दिली जाईल. कोणत्याही संकटप्रसंगी किंवा आणीबाणीच्या वेळी रेल रेडिओ सावधगिरीचा इशाराही देईल. संगीत आणि गाण्यांशिवाय रेल रेडिओवरून विनोद, फलज्योतिष्य आणि इतर गमतीजमती, भारतीय रेल्वेचा इतिहास आणि महत्त्वाच्या उपक्रमांची माहितीही प्रवाशांना मिळेल.