विजय मल्ल्याच्या तोंडून ऐका, किंगफिशर बंद पडण्यामागची कारणे...

By admin | Published: March 3, 2017 04:09 PM2017-03-03T16:09:19+5:302017-03-03T16:23:45+5:30

कर्ज बुडवून परदेशात पसार झालेल्या विजय मल्ल्याने किंगफिशर एअरलाईन्सच्या पतनासाठी प्रॅट अॅण्ड व्हिटनी कंपनीला जबाबदार धरले आहे.

Listen to Vijay Mallya, the reasons behind shutting down Kingfisher ... | विजय मल्ल्याच्या तोंडून ऐका, किंगफिशर बंद पडण्यामागची कारणे...

विजय मल्ल्याच्या तोंडून ऐका, किंगफिशर बंद पडण्यामागची कारणे...

Next

ऑनलाइन लोकमक 

लंडन, दि. 3 - भारतीय बँकांचे हजारो कोटी रुपयांचे कर्ज बुडवून परदेशात पसार झालेल्या विजय मल्ल्याने किंगफिशर एअरलाईन्सच्या पतनासाठी प्रॅट अॅण्ड व्हिटनी कंपनीला जबाबदार धरले आहे. प्रॅट अॅण्ड व्हिटनीने किंगफिशरला एअरलाईन्सला खराब दर्जाच्या इंजिन्सचा पुरवठा केल्यामुळे कंपनी बंद पडली असा आरोप मल्ल्याने केला आहे. 
 
नुकसानभरपाई वसूल करण्यासाठी पीडब्ल्यु ग्रुपची उपकंपनी आयएई विरोधात खटला दाखल केल्याची माहिती मल्ल्याने टि्वटरवरुन दिली. डीजीसीएऩे प्रॅट अॅण्ड व्हिटनी कंपनीच्या इंजिन्सची चौकशी करण्याचे आदेश दिल्यानंतर दोन दिवसांनी मल्ल्याने हे टि्वट केले. 
 
ए 320 निओ विमानांमध्ये प्रॅट अॅण्ड व्हिटनी कंपनीचे इंजिन्स बसवण्यात आले आहेत. या इंजिन्स विरोधात तक्रारी असल्याने डीजीसीएने चौकशीचे आदेश दिले आहेत. इंडिगोच्या ताफ्यात 129 A-320 विमाने आहेत. त्यातील 16 नियो विमाने आहेत. गो एअरच्या 24 विमानांपैकी 5 नियो विमाने आहेत. 
 

Web Title: Listen to Vijay Mallya, the reasons behind shutting down Kingfisher ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.