दोन महिन्यांपासून बेपत्ता होती चिमुकली; घराच्या बाजूला असलेल्या खड्ड्यात मिळाला मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2025 15:51 IST2025-02-24T15:50:10+5:302025-02-24T15:51:25+5:30
५५ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या एका ५ वर्षाच्या चिमुकलीचा मृतदेह घराच्या बाजूला असलेल्या खड्ड्यात सापडला.

दोन महिन्यांपासून बेपत्ता होती चिमुकली; घराच्या बाजूला असलेल्या खड्ड्यात मिळाला मृतदेह
५ वर्षांची चिमुकली, ५५ दिवसांपूर्वी म्हणजे दोन महिन्यांपूर्वी बेपत्ता झाली. ७ पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तिचा शोध घेत होते. सगळीकडे शोध सुरू असताना या मुलीचा मृतदेह घराच्या बाजूला असलेल्या पाण्याने भरलेल्या एका मोठ्या खड्ड्यात आढळून आला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
५ वर्षांची उमरा ३१ डिसेंबर २०२४ बेपत्ता झाली होती. अचानक बेपत्ता झाल्याने तिच्या कुटुंबीयांना धक्का बसला. याप्रकरणी त्यांनी पोलिसांत बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. पोलिसांनी घटनेचं गांभीर्य ओळखून तपास सुरू केला. पण, तिचा मृतदेह घराच्या बाजूला असलेल्या खड्ड्यातच आढळल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
मुलीचा मृतदेह खड्ड्यात कसा पोहोचला?
सहायक पोलीस अधीक्षक किरण कुमार यांच्या नेतृत्वाखाली सात पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी काम करत होते. मुलीचा शोध घेण्यासाठी पथकेही स्थापन करण्यात आली होती. पोलिसांनी तिच्याबद्दल सोशल मीडियावर माहिती दिली होती.
सगळीकडे शोध सुरू असताना उमराचा मृतदेह घराच्या बाजूला आढळून आला. त्यामुळे ती त्या खड्ड्यात पडली की, तिचा मृतदेह फेकला? तिचा मृतदेह तिथपर्यंत कसा पोहोचला? असे प्रश्न आता पोलिसांसमोर उपस्थित झाले आहेत.
उमराचा पाण्यात पडून मृत्यू झाला? तिची हत्या करून मृतदेह पाण्यात टाकण्यात आला की, दुसऱ्या जागी हत्या करून मृतदेह इथे आणून फेकरण्यात आला? या मुद्द्यावर लक्ष्य केंद्रीत करून आता पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
दरम्यान, मयत चिमुकलीच्या कुटुंबीयांनी हत्या केल्याची शंका व्यक्त केली आहे. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून, तपास सुरू केला आहे.