अयोध्या दौरा Live - 'निवडणुकांआधी राम राम अन् निवडणुकांनंतर आराम', मोदी सरकारचं हेच काम'
LIVE
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2018 09:02 AM2018-11-25T09:02:41+5:302018-11-25T11:01:07+5:30
अयोध्या - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अयोध्येत दाखल झाले आहेत. राम मंदिराच्या उभारणीसाठी राम जन्मभूमीवर शिवसैनिकांनी गर्दी केली असून ...
अयोध्या - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अयोध्येत दाखल झाले आहेत. राम मंदिराच्या उभारणीसाठी राम जन्मभूमीवर शिवसैनिकांनी गर्दी केली असून उद्धव ठाकरे यांनी आज सकाळी रामलल्लाचे दर्शन घेतले. त्यानंतर, माध्यमांशी बोलताना उद्धव यांनी मोदी सरकारवर टीकेचे बाण सोडले. निवडणुकांआधी राम राम अन् निवडणुकांनंतर आराम, असे सरकारचे काम असल्याची टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे.
त्या पार्श्वभूमीवर अयोध्येत कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
Live Update :
शरयू नदीवर उभारणा श्रीरामांची भव्य मूर्ती, मराठी कलाकार राम सुतार यांनी घडवलीय ही मूर्ती
उद्धव ठाकरेंनी सहकुटुंब घेतले राम लल्लाचे दर्शन, दुपारी मुंबईला परतणार
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे लक्ष्मण किला येथे दाखल झाले आहेत. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
उद्धव ठाकरे काही वेळातच राम लल्लाच्या दर्शनाला जाणार आहेत.
उद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याच्या आजचा दुसरा दिवस आहे.
Security has been tightened in Ayodhya ahead of the separate events of Shiv Sena and VHP being organised in the city today over the matter of #RamTemple. pic.twitter.com/7pHNcrEl2w
— ANI UP (@ANINewsUP) November 25, 2018
LIVE
25 Nov, 18 : 02:00 PM
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अयोध्या दौरा आटपून मुंबईकडे रवाना
25 Nov, 18 : 11:21 AM
मुख्यमंत्री योगीजींनी म्हटले होते की अयोध्येत मंदिर होते, राहिल आणि बनणार, पण मंदिर कुठेच दिसत नाही - उद्धव ठाकरे
Maine suna tha ki CM Yogi ji ne kaha ki mandir tha, hai aur rahega. Ye to hamari dhaarna hai, hamari bhavna hai. Dukh iss baat ka hai ki wo dikh nahi raha, wo mandir dikhega kab. Jald se jald uska nirmaan hona chahiye: Uddhav Thackeray, Shiv Sena chief pic.twitter.com/3mjgtSOwHN
— ANI UP (@ANINewsUP) November 25, 2018
25 Nov, 18 : 10:55 AM
राम मंदिरातील जागेत अद्भूत शक्ती, मी रोमांचित झालो
25 Nov, 18 : 10:50 AM
काहीही करा, पण लवकरात लवकर राम मंदिराची उभारणी झाली पाहिजे.
25 Nov, 18 : 10:47 AM
अयोध्येत येण्यामागी कुठलाही छुपा अजेंडा नाही
25 Nov, 18 : 10:46 AM
उत्तर प्रदेश सरकारचे आभार, पोलीस प्रशासन अन् अयोध्यावासियांही आभार - उद्धव ठाकरे
निवडणूक आली की राम आणि निवडणुका झाल्या की आराम
25 Nov, 18 : 10:25 AM
- उद्धव ठाकरे पंचवटी हॉटेलवर परतले, थोड्याच वेळात घेणार पत्रकार परिषद
25 Nov, 18 : 10:04 AM
अयोध्या : रामल्ला मंदिरातून श्रीरामाचे दर्शन घेऊन उद्धव ठाकरे मंदिर परिसरातून निघाले
Ayodhya: Shiv Sena chief Uddhav Thackeray returns to the hotel after visiting the Ram Lalla temple earlier today. pic.twitter.com/Py0I4yPdKd
— ANI UP (@ANINewsUP) November 25, 2018
25 Nov, 18 : 10:02 AM
शरयू नदीवर उभारणार श्रीरामांची भव्य मूर्ती, मराठी कलाकार राम सुतार यांनी घडवलीय ही मूर्ती
आमचा राम अयोध्येतच 'वनवास भोगतोय', मोदी सरकारविरुद्ध 'सामना' रंगला https://t.co/arWNjSaSXs