काडीमोड घेतल्याशिवाय ‘लिव्ह इन’ अमान्यच: उच्च न्यायालय, नाते केवळ शारीरिक संबंधांपुरतेच

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2024 07:28 AM2024-03-14T07:28:34+5:302024-03-14T07:29:22+5:30

अलाहाबाद उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. 

live in relationship void without divorce said high court | काडीमोड घेतल्याशिवाय ‘लिव्ह इन’ अमान्यच: उच्च न्यायालय, नाते केवळ शारीरिक संबंधांपुरतेच

काडीमोड घेतल्याशिवाय ‘लिव्ह इन’ अमान्यच: उच्च न्यायालय, नाते केवळ शारीरिक संबंधांपुरतेच

प्रयागराज : हिंदू विवाह कायद्यानुसार, पती-पत्नी जिवंत आहेत आणि त्यांनी काडीमाेड घेतलेला नसल्यास दाेघांपैकी काेणीही दुसरा विवाह करू शकत नाही. काडीमाेड घेतल्याशिवाय इतर काेणासाेबत ‘लिव्ह इन’मध्ये राहता येणार नाही, अलाहाबाद उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. 

कासगंज येथील एका विवाहित महिलेची ‘लिव्ह इन’मध्ये राहण्याबाबतची याचिका फेटाळून लावली आणि तिला दाेन हजार रुपयांचा दंडही ठाेठावला.  न्या. रेणू अग्रवाल यांनी निर्णय देताना सांगितले की, बेकायदा नात्यांना न्यायालयाचे कदापि समर्थन मिळू शकणार नाही. विवाहित महिलेने पतीसाेबत काडीमाेड घेतल्याशिवाय इतर काेणासाेबत ती ‘लिव्ह इन’मध्ये राहू शकणार नाही. (वृत्तसंस्था)

असे नाते ठरते कायद्याच्या विरुद्ध

- याचिकाकर्ता महिला आणि तिचा प्रियकर हे दाेघेही विवाहित असून जाेडीदाराला साेडून केवळ शारीरिक संबंधांसाठी ‘लिव्ह इन’मध्ये राहत आहेत, असे सुनावणीदरम्यान आढळले. 

- दाेघांपैकी काेणाचाही काडीमाेड झालेला नाही. महिलेला दाेन अपत्ये आहेत. हे कायद्याच्या विराेधात असल्याचे न्यायालयाने म्हटले.

 

Web Title: live in relationship void without divorce said high court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.