भारतात राहायचं तर वंदे मातरम म्हणावंच लागेल: भाजपा आमदार

By admin | Published: April 16, 2017 10:37 AM2017-04-16T10:37:41+5:302017-04-16T10:38:06+5:30

हैदराबाद येथील भाजपाचे आमदार राजा सिंग पुन्हा चर्चेत आहेत. भारतात राहायचं तर वंदे मातरम म्हणावंच लागेल असं ते म्हणाले

To live in India, Vande Mataram will have to say: BJP MLA | भारतात राहायचं तर वंदे मातरम म्हणावंच लागेल: भाजपा आमदार

भारतात राहायचं तर वंदे मातरम म्हणावंच लागेल: भाजपा आमदार

Next
>ऑनलाइन लोकमत
भोपाळ, दि. 16 - हैदराबाद येथील भाजपाचे आमदार राजा सिंग पुन्हा चर्चेत आहेत. भारतात राहायचं तर वंदे मातरम म्हणावंच लागेल असं ते म्हणाले आहेत. मध्य प्रदेशच्या भोपाळमध्ये झालेल्या एका सभेत त्यांनी हे वत्कव्य केलं आहे. यापुर्वी, जर कोणी राम मंदिर बांधण्याचा विरोध केला तर त्याचा शिरच्छेद करू असं ते म्हणाले होते. त्यावरून बराच गदारोळ झाला होता. 
 
""तुम्हाला वंदे मातरम म्हणावंच लागेल, जर तुम्ही म्हणणार नसाल तर भारतात तुमच्यासाठी कुठेही जागा नाही. तरीही जे वंदे मातरम म्हणणार नसतील त्यांच्यासाठी माझ्याकडे "स्पेशल पॅकेज" आहे"", असं राजा सिंग म्हणाले. द न्यूज मिनिटने याबाबत वृत्त दिलं आहे. 
 
यापुर्वी, अयोध्यामध्ये राम मंदिर बांधण्यावरून भाजपाचे आमदार राजा सिंग यांनी वादग्रस्त विधान केलं होतं. जर कोणी राम मंदिर बांधण्याचा विरोध केला तर त्याचा शिरच्छेद करू असं ते म्हणाले होतं. हैदराबादमध्ये एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं होतं. 
 
 "राम मंदिर बांधल्यास गंभीर परिणामांचा सामना करावा लागेल असं म्हणणा-यांना मी सांगू इच्छितो, आम्ही तुमच्या अशाच विधानाची वाट पाहत होतो, जेणेकरून आम्ही तुमचा शिरच्छेद करू शकतो" असं ते म्हणाले होते. यापुर्वीही राजा सिंग यांनी चिथावणीखोर वक्तव्य केली आहेत. राजा यांनी मध्यंतरी फेसबुकवर व्हिडीओ टाकून दलितांना मारहाण करण्याचं समर्थन केलं होतं. जे दलित गोमांस खातात आणि गायींची हत्या करताता त्यांना अशाच प्रकारे मारहाण केली जावी असं ते म्हणाले होते. 
 

Web Title: To live in India, Vande Mataram will have to say: BJP MLA

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.