पंतप्रधान मोदींनी रचला इतिहास, वर्षात दुसऱ्यांदा लाल किल्ल्यावर केलं ध्वजारोहण

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2018 08:34 AM2018-10-21T08:34:45+5:302018-10-21T11:19:48+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवीन इतिहास रचला आहे. लाल किल्ल्यावर त्यांनी वर्षात दुसऱ्यांदा ध्वजारोहण केले आहे. 

Live : pm narendra modi flag red fort azad hind anniversary independence day | पंतप्रधान मोदींनी रचला इतिहास, वर्षात दुसऱ्यांदा लाल किल्ल्यावर केलं ध्वजारोहण

पंतप्रधान मोदींनी रचला इतिहास, वर्षात दुसऱ्यांदा लाल किल्ल्यावर केलं ध्वजारोहण

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवीन इतिहास रचला आहे. लाल किल्ल्यावर त्यांनी वर्षात दुसऱ्यांदा ध्वजारोहण केले आहे. तसं, पाहायला गेले तर 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावर पंतप्रधानांच्या हस्ते ध्वजारोहण करण्याची परंपरा आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी ही परंपरा मोडून आज वर्षातून दुसऱ्यांदा तिरंगा फडकवला आहे. कारण, 75 वर्षांपूर्वी म्हणजे 21 ऑक्टोबर 1943 रोजी सुभाषचंद्र बोस यांनी 'आझाद हिंद सरकार'ची स्थापना केली होती. नेताजी सुभाष चंद बोस यांच्या नेतृत्वातील 'आझाद हिंद सरकार'च्या 75व्या जयंतीनिमित्त आज लाल किल्ल्यावर ध्वजारोहण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांच्यासहीत आझाद हिंद सेनेतील लाती राम आणि सुभाष चंद्र बोस यांच्या कुटुंबातील सदस्यदेखील सहभागी झाले आहेत. 

(Police Commemoration Day : शहिदांच्या शौर्याच्या आठवणीने पंतप्रधान मोदी झाले भावूक)

इतकेच नाही तर सुभाष चंद्र बोस आणि आझाद हिंद सेनेच्या आठवणी ताज्या करण्यासाठी पंतप्रधान मोदी अंदमान-निकोबार येथेही जाणार आहेत. या दौऱ्यादरम्यान ते सेल्युलर कारागृहाला भेट देणार आहेत. जेथे स्वातंत्र्यसाठी लढणाऱ्या सैनिकांना काळ्या पाण्याची शिक्षा दिली जायची.

दरम्यान,  राजधानी नवी दिल्लीत राष्ट्रीय पोलीस स्मारकाचेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. वेगवेगळ्या राज्यांमध्ये शहीद झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना यावेळी पंतप्रधान मोदी यांनी श्रद्धांजली वाहिली. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांनीही शहिदांना आदरांजली वाहिली. 






 



 



 

 




 



 





 

Web Title: Live : pm narendra modi flag red fort azad hind anniversary independence day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.