‘लिव्ह इन रिलेशनशिप’ हा सामाजिक दहशतवाद; राजस्थान मानवी हक्क आयोगाच्या अध्यक्षांचे मत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2017 11:55 PM2017-08-19T23:55:15+5:302017-08-19T23:55:21+5:30
विवाह न करता स्त्री-पुरुषांनी पती-पत्नीप्रमाणे एकत्र राहण्याच्या (लिव्ह इन रिलेशनशिप) प्रथेची लागण हा सामाजिक दहशतवाद आहे व यावरही विवाहाप्रमाणे बंधने हवीत, असे मत राजस्थान मानवी हक्क आयोगाच्या अध्यक्षांनी व्यक्त केले.
जयपूर : विवाह न करता स्त्री-पुरुषांनी पती-पत्नीप्रमाणे एकत्र राहण्याच्या (लिव्ह इन रिलेशनशिप) प्रथेची लागण हा सामाजिक दहशतवाद आहे व यावरही विवाहाप्रमाणे बंधने हवीत, असे मत राजस्थान मानवी हक्क आयोगाच्या अध्यक्षांनी व्यक्त केले.
आयोगाचे अध्यक्ष न्या. प्रकाश तातिया म्हणाले की, ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहणा-या महिलेला पुरुष सोडतो, तेव्हा तिची अवस्था घटस्फोटित स्त्रीपेक्षाही वाईट होते.
हा दोन सज्ञान व्यक्तींनी आपल्या मर्जीनुसार एकत्र राहण्यापुरता मर्यादित विषय नाही. समाजावर होणारे अनिष्ट परिणामही लक्षात घ्यायला हवेत, यावर भर देताना न्या. तातिया म्हणाले की, विवाहाविना एकत्र राहणाºया दोन व्यक्तींना आपले आयुष्य हवे तसे जगताना मानवी संबंधांना असलेली प्रतिष्ठा धुळीला मिळविण्याचा काहीही अधिकार नाही. (वृत्तसंस्था)
तिला आम्ही काय उत्तर द्यावे?
न्या. तातिया म्हणाले की, ५० वर्षांची स्त्री घटस्फोटानंतर पुरुषासोबत १० वर्षे ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहात होती. तिला कर्करोगाचे हे निदान होताच जोडीदाराने तिला सोडून दिले. माझ्या मानवी हक्कांचे रक्षण करा, अशी याचिका ती आयोगाकडे आली. तिला आयोगाने काय उत्तर द्यावे?