मृत्यूचा LIVE व्हडिओ: मित्रांसोबत पाण्यात उडी मारली, मित्र बाहेर आले पण तो बुडाला...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2022 04:01 PM2022-07-29T16:01:09+5:302022-07-29T16:01:57+5:30
पावसाळ्यात अनेकजण ट्रेकिंगला किंवा मौजमजा करण्यासाठी फिरायला जातात. पण, कधी-कधी थोडाही निष्काळजीपणा मृत्यूला कारणीभूत ठरू शकतो.
पावसाळ्यात अनेकजण मौजमजा करण्यासाठी कुठेतरी फिरायला जातात. पण, कधी-कधी थोडा निष्काळजीपणा मृत्यूला कारणीभूत ठरू शकतो. जोधपूरच्या बेरी गंगा टेकड्यांवरील तलावात अशाच प्रकारची एक घटना घडली आहे. मित्रांसोबतच्या मस्ती करायला आलेल्या जितेंद्र मेघवाल यांना निष्काळजीपणा जीवावर बेतला. या घटनेचा एक व्हिडिओही समोर आले असून, त्यात जितेंद्र आपल्या दोन मित्रांसह तलावात उडी मारल्याचे स्पष्ट दिसत आहे.
मौत का Live Video:
— Kumar Abhishek (TV9 Bharatvarsh) (@active_abhi) July 29, 2022
दोस्तों के साथ मस्ती के बीच युवक ने बरती लापरवाही. बहते झरने के पास बने कुंड की झाड़ियों में फंसा युवक जिंदगी के लिए झटपटाता रहा, लेकिन देखते ही देखते उसे मौत ने बना लिया अपना शिकार.
वायरल वीडियो राजस्थान के जोधपुर का है.#jodhpur#rajasthanpic.twitter.com/Z9tq36DM95
टीव्ही9 हिंदीने पोस्ट् केलेल्या व्हिडिओत स्पष्टपणे दिसत आहे की, मित्रांसोबत जितेंद्र पाण्यात उडी घेतात. दोन मित्र अगदी सहज तो पाण्याचा कुंड पार करतात, पण जितेंद्र झुडपात अडकून बुडायला लागतो. जोधपूरमध्ये 4 दिवसांपूर्वी सुरू झालेल्या मुसळधार पावसानंतर डोंगराळ भागातील धबधब्याजवळ पर्यटनासाठी लोकांची गर्दी होऊ लागली आहे. मंडोरे भागातील बेरी गंगेच्या डोंगरावरून वाहणाऱ्या धबधब्यांचे मनमोहक दृश्यही लोकांना आकर्षित करत आहे.
मित्रांनी वाचवण्याचा प्रयत्न केला
व्हिडिओमध्ये जितेंद्र जीव वाचवण्याचा अतोनात प्रयत्न करताना दिसला. धबधब्याजवळ उभ्या असलेल्या त्याच्या मित्रांनी जितेंद्रला वाचवण्याचा प्रयत्न केला, पण तोपर्यंत जितेंद्रचा बुडून मृत्यू झाला होता. या घटनेनंतर एसडीआरएफच्या टीमने जितेंद्रचा मृतदेह शोधून काढला. या घटनेनंतर जिल्हाधिकारी हिमांशू गुप्ता यांनी लोकांना पाण्याजवळ न जाण्याचे आवाहन केले आहे. सध्या अनेक जलाशयांजवळ बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.