विदेशात वास्तव्य; तर नोकरीवर गंडांतर
By admin | Published: November 4, 2015 02:02 AM2015-11-04T02:02:13+5:302015-11-04T02:02:13+5:30
आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांनी विदेशातील कामाची जबाबदारी पार पाडताना निर्धारित मुदतीपेक्षा जास्त काळ वास्तव्य केल्यास नोकरी गमावण्याची वेळ येऊ शकते.
नवी दिल्ली : आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांनी विदेशातील कामाची जबाबदारी पार पाडताना निर्धारित मुदतीपेक्षा जास्त काळ वास्तव्य केल्यास नोकरी गमावण्याची वेळ येऊ शकते. त्यांनी परवानगीविना अनधिकृत रजा घेतल्यास कठोर कारवाई करण्याचा इशाराही कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने (डीओपीटी) नवे नियम जारी करताना दिला आहे.
कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर राज्यांनी कारवाई न केल्यास केंद्र स्वत:हून या अधिकाऱ्याचा राजीनामा मागेल. काही अधिकारी विदेशातील जबाबदारी पार पाडून मायदेशी परतल्यानंतर त्याबाबत माहिती देत नाहीत. आयएएस, आयपीएस व आयएफओंनी मंजूर रजेपेक्षा अधिक काळ विदेशात घालवायचा असेल किंवा अभ्यास रजा घ्यायची असेल तर हा कालावधी महिन्यापेक्षा जास्त असायला नको.